मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
गावातील एका शाळकरी मुलीचे आजाराने निधन झाले आहे. तिच्या निधनामुळे संपूर्ण गावात नागपंचमीचा सण साजरा न करण्याचा निर्णय गावाने घेतला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील जि. प. प्राथमिक शाळा डोंगरगाव या शाळेत इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या अपेक्षा तानाजी साखरे या विद्यार्थिनीचे काल रविवारी अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे यावर्षीचा नागपंचमीचा सण साजरा न करण्याचा निर्णय गावाने घेतल्याचे सरपंच सारिका खिलारे यांनी सांगीतले.
अपेक्षा हिच्या अचानक निधनाने अख्ख डोंगरगाव हळहळत असून तिच्या अंत्यविधीला शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ तसेच गावातील सर्व समाजातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
अपेक्षा ही डोंगरगाव शाळेतील सर्वात हुशार विदयार्थीनी होती. ती फक्त साखरे परिवाराची लेक नसून संपूर्ण डोंगरगावकरांची लेक अशी भावना व्यक्त होत असून नागपंचमीचा सण साजरा न करण्याचा निर्णय डोंगरगाव ग्रामपंचायतीने घेतला असून
सर्वच गावाकऱ्यांनी हा सण साजरा न करता आज एक दिवसाचा दुखवटा पाळावा असे आवाहन सरपंच सारिका खिलारे यांनी डोंगरगावच्या ग्रामस्थांना केले आहे.
दरम्यान, सध्या डेंगू व गोचीड ताप याची साथ मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे, त्यामुळे घरात लहानापासून मोठ्यापर्यंत कोणालाही ताप, कणकण, थंडी आदी त्रास होत असेल तर अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांना दाखवावे असे आवाहन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज