mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जीवनमान उंचवणार! पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषदांच्या विविध विकास कामांना १० कोटी रुपये निधी मंजूर; ‘ही’ कामे मार्गी लागणार; आ.आवताडे यांची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 19, 2023
in मंगळवेढा
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विशेष अनुदान म्हणून पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषदांसाठी  विविध विकास कामांना १० कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.

मंजूर झालेल्या या निधीमध्ये मंगळवेढा नगरपरिषदसाठी ५ कोटी व पंढरपूर नगरपरिषदसाठी ५ कोटी एवढा निधी आहे. आ. आवताडे यांच्या प्रयत्नांनातून मंजूर सदर निधीमुळे पंढरपूर व मंगळवेढा शहरांच्या विविध विकास कामांना चालना मिळणार आहे.

सदर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध होणेकामे आमदार आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता.

देशातील एक महत्त्वपूर्ण आणि खूप मोठी अध्यात्मिक परंपरा असलेल्या पंढरपूर व मंगळवेढा शहरांसाठी या निधीमुळे भौतिक सोयी – सुविधा खूप सक्षम आणि व्यापक होणार आहेत.

पंढरपूर शहरातील मंजूर झालेली कामे-

बालाजी नगर ओपन प्लेस मध्ये सभामंडप बांधणे, बालाजी नगर नागालँड पाठीमागे मारुती मंदिराजवळ ओपन जिम करणे, जिजाऊ नगर ओपन प्लेस गार्डन व सुशोभीकरण करणे, नागरिकांना बसण्यासाठी बाकडे, जिम करणे,

बालाजी नगर प्लेस ओपनमध्ये सुशोभीकरण करणे, जोगेश्वरी मिसळ ते जुना अकलूज रस्ता सुधारणा करणे, उन्नती रेसिडेन्सी ओपन प्लेसमध्ये हायमास्ट बसविणे,

मंगळवेढेकर नगर मध्ये ओपन प्लेस विकसित करणे, मंगळवेढेकर नगर येथे गोरवे घर ते विकास माने घर रस्ता सुधारणा करणे, एकता नगर मधील नागालँड पाठीमागे ओपन प्लेस विकसित करणे, अखिल भारतीय पद्मशाळा समोर पार्किंग ग्राउंड मध्ये हायमास्ट बसवणे, बिल्डर्स कॉर्नर ते अन्नपूर्णा कोल्ड्रिंक्स पाठीमागील रस्ता काँक्रिटीकरण  करणे, टिळक स्मारक ते लक्ष्मीपथ( गोल्डन टी पाठीमागील बाजू) पर्यंत गटार बांधणे, कॉलेज चौक पोलीस स्टेशन पाठीमागे गांधी बंगला ते प्लॉट नंबर.२६पर्यंत रस्ता सुधारणा करणे,

जुनी वडार गल्ली येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे, बडवेचर झोपडपट्टीमध्ये हायमास्ट बसवणे, भगवान नगर जोगदंडे महाराज ते परदेशी दुकान पर्यंत रस्ता सुधारणा करणे, झेंडे गल्ली येथील उखळीकर महाराज मठ ते नरहरी  सोनार महाराज मठ रस्ता सुधारणा करणे, भूयाचा मारुती ते अनिल डोंबे पुतळा रस्ता सुधारणा करणे, कुंभार गल्ली येथील सटवाई देवी समोर हायमास्ट बसविणे,

इंडस्ट्रीज एरिया सटवाई मंदिर ते मायाक्का देवी मंदिर रस्ता सुधारणा करणे, कुंभार गल्ली येथील अंतर्गत गटार बांधणे, भगवान नगर परदेशी दुकान ते यमाई तलाव पर्यंत रस्ता सुधारणा करणे, चंद्रमा रेसिडेन्सी ओपन स्पेस येथे हायमास्ट बसविणे, हरी नयन पार्क अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, वीर शिवबा काशीद चौक येथील ब्लड बँके शेजारील नगरपालिका जागा विकसित करणे,

सांगोला रोड बाळूमामा मंदिराच्या उत्तरेकडील रस्ता सुधारणा करणे, वांगीकर सर्वे नंबर ८५ डॉ.खुपसंगीकर – लिगाडे सर घर रस्ता सुधारणा करणे, वांगीकर सर्वे नंबर ८५ बोंगे साहेब ते जेधे सर घर रस्ता सुधारणा करणे, वांगीकर सर्वे नंबर ८५ वाघमारे ते सावंत साहेब साहेब शेटे साहेब, सातपुते सर घर रस्ता सुधारणा करणे, रेल्वे ग्राउंड मध्ये आसन व्यवस्था असणे, समर्थ रेसिडेन्सी ते शरद छबुराव चव्हाण घर रस्ता सुधारणा करणे, स्वप्निल कमसल घर ते योगेश काळे घर रस्ता सुधारणा करणे, दीपक वाडदेकर घरासमोरील रस्ता सुधारणा करणे,

इसबावी येथील स्वामी समर्थ नगर अंतर्गत रस्ते सुधारणा करणे, हर्षद मेडिकल पाठीमागील बाजूस रुक्मिणी नगर येथील ओपन प्लेस विकसित करणे, इसबावी येथील सावरकर नगर मधील तलाठी कॉलनी मध्ये रस्ता सुधारणा करणे, स्वामी समर्थ नगर मधील माने घर ते गोपाळ घाडगे घर रस्ता सुधारणा करणे, सांगोला रोड एम एस ई बी जवळ ते ते देवकते मळा मज्जिद पर्यंत रस्ता सुधारणा करणे, प्रभाग क्रमांक १५ हनुमान व नरसिंह मंदिरासमोर हायमास्ट बसविणे, राजेंद्र गगने घर ते धर्मा शिंदे घर रस्ता सुधारणा करणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दुरुस्ती विषयक कामे करणे, इसबावी येथील गोविंद नगर मठाजवळ गट नं.८९ पर्यंत अंतर्गत गटार करणे,

संत पेठ शाळा नं ७ यादव ऑफसेट समोर हायमास्ट बसविणे, इसबावी शिवाजीनगर गणेश मंदिर शेजारी बोअर व पाण्याची मोटार बसवणे, इंदिरा कुष्ठरोग वसाहत गोपाळपूर रोड येथे हायमास्ट बसवणे, केमिस्ट भवन शेजारी भट्टड घर ते विस्थापित नगर जाणारा रस्ता सुधारणा करणे, लिंगायत व मुस्लिम समाजासाठी दफनभूमी मध्ये विकास कामे करणे, गांधी रोड गुंडेवार रोड ते बुरुड गल्ली रस्ता सुधारणा करणे, टाकळी रोड सुहासिनी दुग्धालयासमोर हायमास्ट बसवणे, चैतन्य नगर सोसायटी मधील ओपन स्पेस विकसित करणे,

हॉटेल श्रद्धा सागर जवळ हायमास्ट बसवणे, प्रभाग क्रमांक १५ येथील वैभव डोके ते राजू डोके घर रस्ता सुधारणा करणे, भक्ती शक्ती चौक ते हिंदुस्थान चौक रस्ता सुधारणा करणे व पाण्याची टाकी बसविणे, अनुसयाबाई लाड नगर येथील ओपन स्पेस विकसित करणे, इस्माईल बोहरी घरासमोर मांगोडकर वाडा येथे लादीकरण करणे, आंबेडकर नगर येथील अनिल कांबळे यांच्या घरापाठीमागे हायमास्ट बसवणे.

योजनेअंतर्गत मंगळवेढा नगर परिषदेसाठी मंजूर झालेली कामे-

मंगळवेढा शहरातील नगरपालिका शाळा नंबर १ येथे नवीन इमारत खोल्या बांधणे, मुरलीधर चौक ते शनिवार पेठ नगरपालिका हद्दीपर्यंत व जुनी बँक ऑफ इंडिया ते मुदगल ऑफिसपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, बोराळे नाका ते सांगोला नाका रस्त्याच्या दुतर्फा  लाईट बसवणे, आठवडा बाजार शेडच्या आजूबाजूचा भाग काँक्रिटीकरण व गटार करणे,

नागणेवाडी येथील नागराज चौक जुनी पाण्याची टाकी पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, मारुती पटांगण काँक्रिटीकरण करणे, मुरडे गल्ली येथील पंडित ऑफिस ते महालक्ष्मी मंदिर ते पप्पू सावंजी घर पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, भारत सावंजी दुकान ते तुषार काकडे दुकान ते दादा नागणे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे, वसंत गेजगे घर ते कारखाना चौक रस्ता काँक्रिटीकरण करणे,

बुरुड गल्लीतील महादेव पवार घरासमोरील सर्व पटांगण (चौक)काँक्रिटीकरण करणे, संतोष बुरकूल दुकान ते डीसीसी बँकेपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, डांगे गल्ली येथील ज्योतिबा काठी मंदिरासमोर हायमास्ट बसविणे, तहसील कार्यालयाच्या बाजूने डीवायएसपी ऑफिस कडे जाणाऱ्या रोडवरती नगरपालिका हद्दीत हायमास्ट बसविणे, मुकबुल तांबोळी यांच्या घरासमोरील पटांगणामध्ये हायमास्ट बसविणे, न्यायालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला नगरपालिका हद्दीत हायमास्ट बसविणे.

नागरिकांसाठी आमदार समाधान आवताडे यांनी भौतिक सोयी-सुविधा सक्षम केल्या

देवभूमी आणि संतभूमी अशी सांप्रदायिक ख्याती असणाऱ्या पंढरपूर व मंगळवेढा शहरातील स्थानिक नागरिकांसाठी आमदार समाधान आवताडे यांनी भौतिक सोयी – सुविधा सक्षम करण्यासाठी व शहरवासियांचे जीवनमान उंचविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन्ही नगरपरिषदांसाठी उपलब्ध केलेला हा निधी दोन्ही शहरांच्या सर्वांगीण प्रगतीचा सर्व समावेशक सेवासुत आहे. आमदार आवताडे यांची विकासाची ही व्यापक दृष्टी मतदारसंघाचा प्रगती आलेख आणखी समृद्ध आणि विस्तारित करेल-
करुणा निलेश आंबरे, माजी नगरसेविका पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.आवताडेंनी मोठा डाव टाकला; उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंताला गळाला लावले, भाजपची ताकद वाढली

November 12, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद मिळावे, भाजपपुढे ठेवला प्रस्ताव; भाजपकडून प्रतिसाद न आल्यास आमचा ‘हा’ निर्णय जाहीर करू; राष्ट्रवादीचे भाजपवर दबावतंत्र

November 12, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीला रंग चढू लागला; दुसऱ्या दिवशी नगरसेवकपदासाठी ‘इतके’ अर्ज दाखल

November 12, 2025
मोठी बातमी! नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ तीन जणांनी केली उमेदवारीची मागणी; मुलाखतीसाठी हजर असणाऱ्यांनाच मिळणार तिकिट

मोठी बातमी! नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ तीन जणांनी केली उमेदवारीची मागणी; मुलाखतीसाठी हजर असणाऱ्यांनाच मिळणार तिकिट

November 11, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

भाजपमध्ये यंदा ‘नवे चेहरे, नवा आत्मविश्वास’ ही सूत्रे लागू होण्याची चिन्हे; काही माजी नगरसेवकांना भाजप देणार ‘नारळ’; नगराध्यक्षपदाची उमेदवारी…

November 11, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपरीषद निवडणूक! अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ‘या’ कारणामुळे एकही अर्ज नाही दाखल; पहिला दिवस गेला शांततेत

November 10, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

कार्यक्रम…डान्स..आनंद अन् मृत्यू; डान्स करतानाच तरुण ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

November 10, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात; ‘या’ संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार; अर्जासोबत लागणार ‘ही’ कागदपत्रे

November 10, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! हत्येचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा; मंगळवेढा येथील सकल मराठा समाजाची निवेदनाद्वारे केली मोठी मागणी

November 9, 2025
Next Post
अभिजीत पाटील ॲक्शन मोडमध्ये; तलावात लवकरात लवकर पाणी सोडा अन्यथा आंदोलन करणार; जलसंपदा विभागाला दिला इशारा

अभिजीत पाटील ॲक्शन मोडमध्ये; तलावात लवकरात लवकर पाणी सोडा अन्यथा आंदोलन करणार; जलसंपदा विभागाला दिला इशारा

ताज्या बातम्या

चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय ‘या’ व्यक्तीला अटक

November 12, 2025
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.आवताडेंनी मोठा डाव टाकला; उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंताला गळाला लावले, भाजपची ताकद वाढली

November 12, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद मिळावे, भाजपपुढे ठेवला प्रस्ताव; भाजपकडून प्रतिसाद न आल्यास आमचा ‘हा’ निर्णय जाहीर करू; राष्ट्रवादीचे भाजपवर दबावतंत्र

November 12, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीला रंग चढू लागला; दुसऱ्या दिवशी नगरसेवकपदासाठी ‘इतके’ अर्ज दाखल

November 12, 2025
मोठी बातमी! नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ तीन जणांनी केली उमेदवारीची मागणी; मुलाखतीसाठी हजर असणाऱ्यांनाच मिळणार तिकिट

मोठी बातमी! नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ तीन जणांनी केली उमेदवारीची मागणी; मुलाखतीसाठी हजर असणाऱ्यांनाच मिळणार तिकिट

November 11, 2025
सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, पाकिस्तानमध्ये घुसून ‘करारा जवाब’; दहशतवादी अड्डे उध्वस्त

पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा

November 11, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा