टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. रविवारी दिवसभरात 9,926 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 9,509 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 76 हजार 809 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 62.74 टक्के आहे. तर सध्या 1 लाख 48 हजार 537 रुग्णांवर (अॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. रविवारी आणखी 260 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वांधिक रुग्ण हे सातत्याने पुण्यामध्ये सापडत आहेत.
मुंबईची रुग्णसंख्या दररोज एक हजार ते बाराशेचा आसपास रुग्ण सापडत असताना पुण्यात अठराशेच्या आसपास आहे. रविवारी देखील पुणे महापालिका हद्दीत 1 हजार 762 रुग्ण सापडले.
पिंपरी चिंचवड मध्येही 734 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे पुण्याची चिंता आणखी वाढली आहे. नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत प्रत्येकी 400 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले.
नवीन रुग्ण आणि नोंद झालेले 260 मृत्यू याप्रमाणे (कंसात रविवारी नोंद झालेले मृत्यू)
मुंबई मनपा-1105 (49), ठाणे- 217 (2), ठाणे मनपा-282 (14),नवी मुंबई मनपा-400 (8), कल्याण डोंबिवली मनपा-402 (12),उल्हासनगर मनपा-46 (2), भिवंडी निजामपूर मनपा-14 (3) , मीरा भाईंदर मनपा-195 (7),पालघर-113 (4), वसई-विरार मनपा-208 (15), रायगड-247 (5), पनवेल मनपा-147, नाशिक-109, नाशिक मनपा-273 (8), मालेगाव मनपा-8, अहमदनगर-169 (7),अहमदनगर मनपा-136, धुळे-63 (1), धुळे मनपा-63 (3), जळगाव-134, जळगाव मनपा-109 (2), नंदूरबार-13, पुणे- 485 (11), पुणे मनपा-1762 (25), पिंपरी चिंचवड मनपा-734 (15),
सोलापूर-154(8), सोलापूर मनपा-30 (4), सातारा-215 (6), कोल्हापूर-112 (2), कोल्हापूर मनपा-85 (1), सांगली-16 (2), सांगली मिरज कुपवाड मनपा-37 (4), सिंधुदूर्ग-25, रत्नागिरी-94, औरंगाबाद-48 (2), औरंगाबाद मनपा-74 (3), जालना-28 (2), हिंगोली-13 (2), परभणी-3, परभणी मनपा-14 (1), लातूर-83 (4), लातूर मनपा-55 (7), उस्मानाबाद-88 (2), बीड-85, नांदेड-129, नांदेड मनपा-129 (1), अकोला-3 (3), अकोला मनपा-8 (2), अमरावती- 15 (2), अमरावती मनपा-72 (1), यवतमाळ-63 (1), बुलढाणा-41 (1), वाशिम-30 (3), नागपूर-101 , नागपूर मनपा-144 (2), वर्धा-18, भंडारा-5, गोंदिया-5, चंद्रपूर-21, चंद्रपूर मनपा-6 (1), गडचिरोली-14, इतर राज्य 12.
गेल्या चोवीस तासात 117 पोलिसांना कोरोनाची लागण
कोरोनासंबंधी देण्यात आलेली कर्तव्ये बजावत असलेल्या पोलिसांना या रोगाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या चोवीस तासात आणखी 117 पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा 9 हजार 566 वर पोहचला आहे. कंटेन्मेंट झोन, रेड झोन, कोविड रुग्णालये, कोविड सेंटर अशा ठिकाणच्या बंदोबस्तासह शासनाकडून देण्यात आलेली अन्य सर्व प्रकारची कर्तव्ये राज्य पोलीस दल काटेकोरपणे बाजवत असून यातच पोलिसांना या रोगाची लागण होत आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच असून गेल्या चोवीस तासात आणखी 117 पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा 9 हजार 566 वर पोहचला आहे. आतापर्यंत यातील 755 अधिकार्यांसह 6 हजार 779 अंमलदार अशा 7 हजार 534 पोलिसांनी या रोगांवर मात करून ते कोरोना मुक्त झाले आहेत.
कोरोनाची लागण झालेल्या 09 अधिकारी आणि 94 अंमलदार अशा एकूण 103 पोलिसांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर, 224 अधिकारी आणि 1 हजार 705 अंमलदार अशा एकूण 1 हजार 929 पोलिसांवर अद्यापही मुंबईसह राज्यातील विविध रुग्णालये, कोविड सेंटर आणि अलगिकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
In the state, 9 thousand 926 patients were cured during the day, while 9509 new patients were registered
(Source : pudhari)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज