मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोबत मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील छावणी चालकांची सन 2018-19 पासून प्रलंबित असलेली बिले मिळवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.
येत्या चार दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या दालनात याबाबत बैठक घेण्यासाठी ना.सावंत प्रयत्नशील असुन छावण्यांची बिले मिळवण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात यात सर्वात पुढे मी असेन असे आश्वासन भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी यावेळी बोलताना दिले.
सांगोला तहसील कार्यालयासमोर मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील छावणी चालकांच्या धरणे आंदोलनाला भेट दिल्यानंतर सावंत बोलत होते.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, ना.तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने याआधी मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्या दालनात छावणीच्या बिला संदर्भात बैठक झाली होती. काही अपरिहार्य कारणामुळे त्यावेळेस केलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही.
पण मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील छावणी चालकांचा हा प्रश्न त्या बैठकीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेला आहे. आता ना.सावंत हे प्रयत्नशील असलेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत या प्रश्नावर हमखास तोडगा निघेल. अशी माहितीही यावेळी बोलताना सामंत यांनी दिली.
अनिल सावंत यांनी छावणी चालकांच्या आंदोलनाला भेट दिल्यामुळे सर्व आंदोलन चालकांनी सावंत यांचे आभार मानले. यावेळी मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील छावणी चालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज