टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील कामती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व अवैध धंद्यांना ऊत आला आहे. बेसुमार अवैध वाळु उपसा सुरु आहे. पोलीस स्टेशनमध्ये सर्व अवैध व्यवसायिकांना मान-सन्मान दिला जातो. तर गोर-गरीब सर्वसामान्य जनता, लोकप्रतिनिधी, पत्रकार , प्रतिष्ठित नागरीक यांना दुजाभावाची वागणुक दिली जाते. गोरगरिबांना कायद्याचा धाक दाखवुन विनाकारण पैसे उकळण्याचा गोरज धंदा बेभानपणे सुरु आहे. यामुळे स.पो.नि. किरण उंदरे यांची बदली व्हावी यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले यांनी निवेदन दिले होते. Replace Kamati’s SPO Undre, ShivSena’s warning of Chakka Jam agitation
त्यानुसार त्यांच्या बदलीचा आदेश निघाला देखील मात्र पुन्हा स्थगिती दिली. यामागचे गौडबंगाल काय..? असा सवाल उपस्थित करुन येत्या ८ दिवसात त्यांची बदली न झाल्यास कामती चौकात चक्का जाम करु असा इशारा सर्वपक्षीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अनिल देशमुख गृहमंत्री, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई गृह राज्यमंत्री, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना पक्ष प्रतोद सुनिल प्रभु, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र डॉ. सुहास वारके, जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर (ग्रामीण) मनोज पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तहसिदार जीवन बनसोडे यांना दिला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की लॉकड़ाउनच्या काळात सर्वाधिक त्रास मजुर व शेतक-यांना दिला असुन प्रामीण भागातील लोकांना रेडझोन अथवा बफर झोन यांची कल्पना नसते अशा गोरगरीब लोकांकडुन ३ हजार ते ७ हजार रुपये पर्यंतची मागणी या लोकांनी केली आहे. या सर्व बाबींना पोलीस ठाण्याचे प्रमुख स.पो.नि.किरण उंदरे साहेब जबाबदार आहेत.
अवैध धंद्याच्या तक्रारी केल्यानंतर तक्रादार यांचे मोबाईल रेकॉर्डींग केले जाते व ते संबंधित अवैध व्यवसायिक यांना ऐकविले जाते त्यामुळे गोपनियतेचा भंग होत असल्याचे सांगुन दोन वर्षात मजुर, शेतकरी, सर्वसामान्य जनतेला स.पो.नि. किरण उंदरे यांनी भरपूर त्रास दिला असल्याचा उल्लेख आवर्जून केला आहे.
या निवेदनात जि.प.सदस्या तथा शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे, जि.प.सदस्य तानाजी खताळ, भीमाचे व्हाईस चेअरमन सतिश जगताप, पं.स.सदस्य जालिंदर लांडे, पं.स.सदस्या सुनिता भोसले, रिपाई चे सुनिल गायकवाड, राष्ट्रवादीचे मनोज गायकवाड तात्यासाहेब खराडे, मारुती जाधव, सरपंच दिपक पुजारी, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, उपतालुकाप्रमुख विनोद आंबरे आदींच्या सह्या करुन आंदोलनात उतरण्याचा इशारा दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज