टीम मंगळवेढा टाईम्स । वीज जोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचार्यांना दमदाटी करून एकास ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश दशरथ चाबुकस्वार ( रा . बजरंग नगर , मजरेवाडी ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.
प्रकाश हा इंदुमती चाबुकस्वार यांच्या घराचे वीज कनेक्शन वारंवार तोडत होता.सोमवारी इंदुमती यांनी वीज कनेक्शन जोडण्यासाठी महावितरणच्या कर्मचार्यांना बोलावले होते. त्यावेळी दशरथ याने त्यांनाही दमदाटी केली आणि इंदुमतीच्या पतीस मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाअसून स.फौ. पवार तपास करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज