मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
महाराष्ट्रातलं राजकारण आतापर्यंतच्या सर्वात रंजक वळणावर आहे. यापूर्वी ज्या घटना घडल्या, यानंतर असं काही घडूच शकत नाही, अशी शक्यता सर्वांना वाटत होती. पण महाराष्ट्राचं राजकारण हे एका घाणेरड्या वळणावर आहे.
एवढं घाणेरडं राजकारण, असं शब्द सहज जनतेच्या तोंडी येत आहेत. म्हणून सर्वसामान्य लोकांनी या राजकारणाला घाणेरडं म्हटलंय, तर आणखी महाराष्ट्रातील राजकारणात पुढे ३ घाणेरड्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. या शक्यता कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने किंवा व्यक्तीच्या तसेच मोठ्मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या बाजूने नाहीत.
या ३ घाणेरड्या शक्यता मात्र परिस्थितीनुसार बदलत जाणार आहेत. तर या ३ घाणेरड्या शक्यता ऐकून तुम्ही असंच म्हणालं, हो याचा विचार केलाच नाही, असं देखील होवू शकतं.
पहिली शक्यता – राष्ट्रवादीच्या बाजूने
अजित पवार यांनी जेवढं संख्याबळ जमा केलं, त्यासाठी भाजपाने तयार केलेली राजकीय परिस्थिती नक्कीच मदतीची ठरली. ही परिस्थिती कायम राहिली, तर आलेले सर्व आमदार, नक्कीच अजित पवार यांच्यासोबत शेवटपर्य़ंत असतील. पण राजकीय परिस्थिती बदलली, निवडणुका लागल्या, आपण निवडून येणार नाहीत, केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी बलाढ्य पक्षाची पावर कमी होईल, ही शक्यता वाढली.
तर यातील बहुतांश बाहेर पडतील. तेव्हा जनता असंच म्हणणार आहे, दुसऱ्याच्या वॉशिंगमशीनमध्ये यांनी कपड्यावरचे डाग धुतले, आणि हे सर्व लपवून ठेवण्यासाठी, यात बडे नेते मात्र असंच म्हणतील, नेमके आम्ही का गेलो होतो, हे योग्य वेळ आल्यावर सांगू.
अजित पवार यापूर्वी ७२ तास राष्ट्रवादी सोडून गेले होते, पण या ७२ तासात त्यांच्यावर कोणतीही कारवाई पक्षाने केली नाही. ते कधीही बाहेर पडले, तरी, ‘सुबह को भुला श्याम को लौटा, तो उसे भुला नही कहते’, या हिंदी म्हणीचा वापर नक्कीच होईल. शरद पवार हे यावर बोलणार नाहीत, आणि जनताच म्हणेल, काय शरद पवार साहेबांनी गेम केला. ही शक्यता राष्ट्रवादीच्या बाजूने वाटते. आता दुसरी शक्यता खाली वाचा.
दुसरी शक्यता – दुसरी देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बाजूने
अजित पवार यांनी पुरेसं संख्याबळ उभं केलं, पण शिंदे गटात आतल्या आत नक्कीच अस्वस्थता आहे, अनिश्चितता आहे. पिंजऱ्यात कोंबडी एकच आणि वाघ मात्र दोन-दोन आणि बाहेर रिंगमास्टर देंवेंद्र फडणवीस अशी अवस्था नक्कीच दिसणार आहे. दोन्ही वाघांना समान वाट्याने कोंबडी फस्त करावी लागेल.
तुम्ही वाघ असाल तर असाल, पण शिस्त पाळावीच लागेल. यात असंही म्हणतात, म्हणजे शक्यता वर्तवली जाते. अजित पवार मुख्यमंत्री होतील किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, या शक्यते मागचं कारण आहे जास्तीच संख्याबळ. देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर राज्यात आतापर्यंत जो उपमुख्यमंत्री झाला, तो नंतर कधी मुख्यमंत्री झालाच नाही, हे भाकीत संपणार आहे.
तिसरी शक्यता – तिसरी शक्यता एकनाथ शिंदे यांच्या बाजूने
अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेले दिग्गज नेते, यातल्या यात सत्तेचा जास्त अनुभव असलेला हा गट सत्तेत आल्यानंतर, आपलं काय होईल ही भीती शिंदे गटात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलतील का, तर आपलं आणि ती शिवसेना-उद्धव ठाकरे यांना सोडून आलेले, आपण आपलं काय होईल, हा विचार करुन काहींना अचानक ‘मातोश्री’ही आठवू शकते.
पण आजही राज्यात फक्त विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकाच नाही, तर नगरपरिषद आणि महापालिका निवडणुका बहुमताने जिंकणे, हे एक मोठं आव्हान भाजपासोबत आहे. नगरपरिषद आणि महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे यांची मदत पुढील काळात मोलाची ठरणार आहे. यामुळे राज्यातलं मुख्यमंत्री बदलेलं ही शक्यता येथे मावळल्यासारखी आहे. (स्रोत:TV9मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज