टीम मंगळवेढा टाईम्स । प्रियदर्शनी नगर येथे एका महिलेचे गंठण पळून गेल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की , फिर्यादी अंबिका सोमनाथ रापोल ( वय ५२ ) रा. प्रियदर्शनी नगर , जुना विडी घरकुल , सोलापूर यांना एका अज्ञात चोरट्याने देवाच्या फोटो समोर गंठण ठेवून पूजा करण्यास सांगितले.
त्यावेळी फिर्यादी हे पूजा करत असताना फोटो समोर ठेवलेले गंठण फिर्यादीची नजर चुकवून त्यांना पूजा करण्यात गुंतवण ६५ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरून नेले.ही घटना दि .३ ऑगस्ट रोजी प्रियदर्शनी नगरातील त्यांच्या राहत्या घरी घडली.
या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून , या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज