मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी घटना टळली आहे. पुनावळे येथील माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट खंडणी विरोधी पथकाला उधळून लावण्यात यश मिळाले आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ओव्हाळ यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. माथाडीच्या कामावरून ओव्हाळ आणि सराईत गुन्हेगार अमोल गारगले यांच्यात पंधरा दिवसापूर्वी वाद झाला होता.
याच वादातून ओव्हाळ यांची हत्या करण्याचा कट गारगले, किशोर बापू भोसले आणि अमित दत्तात्रय पाटूळे यांनी रचला होता, अशी माहिती समोर येत आहे.
यासाठी तडीपार गुंड रविराज केदार यांच्याकडून पिस्तूल, दोन जिवंत काडतुस ही आणली होती. मात्र, त्याअगोदरच त्यांचा हा डाव हाणून पाडत खंडणी विरोधी पथकाने त्यांना अटक केली.
पैकी पिस्तुल पुरवणारा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गारगले त्याच्या साथीदारांसह पुनावळे परिसरात माथाडीचे काम करतो.
ओव्हाळ यांची पाच एकर जमीन नुकतीच डेव्हलपमेंटसाठी बिल्डरला दिली आहे. तिथल्या माथाडीच्या कामावरून ओव्हाळ आणि गारगले यांच्यात वाद झाला होता. हे काम हातातून गेल्यानंतर पुन्हा आपल्याला काम मिळणार नाही. या उद्देशाने ओव्हाळ यांची हत्या करण्याचा प्लॅन गारगले याने केला होता.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून तडीपार असलेला केदार याच्याकडून पिस्तूल व काढतुसेही आणली होती. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये ओव्हाळ यांची हत्या करण्याचा त्यांचा कट होता. त्या अगोदरच खंडणी विरोधी पथकाने आरोपींच्या मुस्क्या आवळत मोठा हत्येचा कट उधळून लावला आहे.
हा हत्तेच कट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे यांच्या टीमने उधळून लावला आहे.( सरकारनामा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज