मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सर्वसामान्य घटकाच्या समस्यांची जाण ठेऊन त्यावर प्रत्यक्षात काम करणार सरकार सत्तेवर आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे.
आषाढी यात्रेत महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून लाखो वारक-यांची आरोग्य सेवा करण्याची संधी मिळाली. आरोग्य विभागाने या संधीचे सोने करत आपले उत्तरदायित्व निभावले आहे.
वारकरी सांप्रदायिक कुटूंबातून आल्यामुळे यावर मी ही स्वतःला भाग्यवान समजतो, अशा शब्दात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आषाढी वारी निमित्त पंढरपूरनजीक वाखरी, ६५ एकर आणि गोपाळपूर या तीन ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी वाखरी येथे शिबिराचे उद्घाटन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास खासदार हेमंत पाटील, तेलंगणाचे आमदार मुधरामजी दयानंद व आ. मैतमपल्ली हनुमंतराव शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, मुन्ना भोसले, आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक आर. डी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, नोडल अधिकारी डॉ. धर्मेद्रकुमार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, डॉक्टर्स, आणि वारकरी भाविक उपस्थित होते.
आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्य सरकारने श्रीशक्ती आणि मातृशक्तीचा सन्मान केला आहे. राज्यातील महिला निरोगी राहाव्यात यासाठी ‘माता सुरक्षित, घर सुरक्षित’ अभियान राबवून सुमारे ४ कोटी ३९ लाख महिलांची तपासणी केली.
‘जागरूक पालक,सदृढ बालक,अभियानातही आरोग्य विभागाने चांगले काम केले आहे. आता अठरा वर्षावरील सर्व पुरुषांची तपासणी करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असून सर्वांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आहे.
सावंत बंधूंचे कौतुक
लाखो वारकऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी महाआरोग्य शिबिराची संकल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल खा. श्रीकांत शिंदे यांनी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत व बंधूचे ‘मनभरून कौतुक केले. परंडा येथे नुकतेच सावंत बंधूनी मोफत आरोग्य शिबिरात इतिहास घडविला होता. त्यानंतर आघाडी वारीतील हे आरोग्य सेवा शिवीर रेकॉर्ड करेल. राज्यातील सरकारही प्रत्यक्ष कामातून असेच रेकॉर्डवर रेकॉर्ड करीत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
खा. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, राज्यात सर्वसामान्यांचे सरकार आहे. एक शेतकन्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने सर्वसामान्य जनतेचे हित डोळयासमोर ठेवून गेल्या वर्षभरात अनेक
‘आयसीयू’, ‘आरोग्य दूत’ सेवा
शिबिराच्या ठिकाणी ५ खाटांसह अद्ययावत अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. यासह वारकऱ्यांना गर्दीतही आपत्कालीन आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवेचा शुभारंभ खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. दि. २७ ते २९ जून या कालावधीत २४ तास आरोग्य शिबीर व सर्व सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकोपयोगी निर्णय घेतले. पंढरपूरच्या आषादी वारीत वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सतत आढावा घेतला. तसेच स्वतः येऊन पाहणी केली. यावर्षी पहिल्यांदाच श्री विठ्ठलाची महापूजा सुरू असतानाही वारकऱ्यांचे दर्शन सुरू ठेवण्याचा व नंतर ‘व्हीआयपी’ दर्शन बंद करण्याचा ऐतिहासीक निर्णय त्यांनी घेतला आहे. एक संवेदनशील नेतृत्वच हे काम करू शकते.
प्रास्ताविक प्रा. शिवाजी सावंत यांनी केले.. यावेळी खा. हेमंत पाटील, ज्योती वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. ऐखयां हिबारे यांनी सूत्रसंचालन केले. तर शिवाजी बाबर यांनी आभार मानले.
फक्त कागदोपत्री नाही तर आम्ही प्रत्यक्ष काम करतो; लाखों वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा करण्याची संधी मिळाली : आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत; ३ ठिकाणी २४ तास मोफत आरोग्य सेवा
We-do-real-work-not-just-paperwork-Got-an-opportunity-to-serve-the-health-of-lakhs-of-workers-Health-Minister-Tanajirao-Sawant-24-hours-free-health-care-at-3-locations
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सर्वसामान्य घटकाच्या समस्यांची जाण ठेऊन त्यावर प्रत्यक्षात काम करणार सरकार सत्तेवर आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे.
आषाढी यात्रेत महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून लाखो वारक-यांची आरोग्य सेवा करण्याची संधी मिळाली. आरोग्य विभागाने या संधीचे सोने करत आपले उत्तरदायित्व निभावले आहे.
वारकरी सांप्रदायिक कुटूंबातून आल्यामुळे यावर मी ही स्वतःला भाग्यवान समजतो, अशा शब्दात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आषाढी वारी निमित्त पंढरपूरनजीक वाखरी, ६५ एकर आणि गोपाळपूर या तीन ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी वाखरी येथे शिबिराचे उद्घाटन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रMसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास खासदार हेमंत पाटील, तेलंगणाचे आमदार मुधरामजी दयानंद व आ. मैतमपल्ली हनुमंतराव शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, मुन्ना भोसले, आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक आर. डी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, नोडल अधिकारी डॉ. धर्मेद्रकुमार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, डॉक्टर्स, आणि वारकरी भाविक उपस्थित होते.
आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्य सरकारने श्रीशक्ती आणि मातृशक्तीचा सन्मान केला आहे. राज्यातील महिला निरोगी राहाव्यात यासाठी ‘माता सुरक्षित, घर सुरक्षित’ अभियान राबवून सुमारे ४ कोटी ३९ लाख महिलांची तपासणी केली.
‘जागरूक पालक,सदृढ बालक,अभियानातही आरोग्य विभागाने चांगले काम केले आहे. आता अठरा वर्षावरील सर्व पुरुषांची तपासणी करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असून सर्वांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आहे.
सावंत बंधूंचे कौतुक
लाखो वारकऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी महाआरोग्य शिबिराची संकल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल खा. श्रीकांत शिंदे यांनी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत व बंधूचे ‘मनभरून कौतुक केले. परंडा येथे नुकतेच सावंत बंधूनी मोफत आरोग्य शिबिरात इतिहास घडविला होता. त्यानंतर आघाडी वारीतील हे आरोग्य सेवा शिवीर रेकॉर्ड करेल. राज्यातील सरकारही प्रत्यक्ष कामातून असेच रेकॉर्डवर रेकॉर्ड करीत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
खा. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, राज्यात सर्वसामान्यांचे सरकार आहे. एक शेतकन्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने सर्वसामान्य जनतेचे हित डोळयासमोर ठेवून गेल्या वर्षभरात अनेक
‘आयसीयू’, ‘आरोग्य दूत’ सेवा
शिबिराच्या ठिकाणी ५ खाटांसह अद्ययावत अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. यासह वारकऱ्यांना गर्दीतही आपत्कालीन आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवेचा शुभारंभ खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. दि. २७ ते २९ जून या कालावधीत २४ तास आरोग्य शिबीर व सर्व सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकोपयोगी निर्णय घेतले. पंढरपूरच्या आषादी वारीत वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सतत आढावा घेतला. तसेच स्वतः येऊन पाहणी केली. यावर्षी पहिल्यांदाच श्री विठ्ठलाची महापूजा सुरू असतानाही वारकऱ्यांचे दर्शन सुरू ठेवण्याचा व नंतर ‘व्हीआयपी’ दर्शन बंद करण्याचा ऐतिहासीक निर्णय त्यांनी घेतला आहे. एक संवेदनशील नेतृत्वच हे काम करू शकते.
प्रास्ताविक प्रा. शिवाजी सावंत यांनी केले.. यावेळी खा. हेमंत पाटील, ज्योती वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. ऐखयां हिबारे यांनी सूत्रसंचालन केले. तर शिवाजी बाबर यांनी आभार मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज