मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा येथे आज १२ जून रोजी नगरपालिका शाळा क्र.१ येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत महसूल प्रशासनाच्या वतीने आयोजित केला असून
शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा महत्वकांक्षी कार्यक्रम दि.१५ एप्रिल ते ३० ऑगस्ट अखेर राबविण्यात येणार असून
यामध्ये शासनाचे सर्व विभाग त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
दरम्यान, अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेस कमी वेळात शासकिय योजनांचा एकछत्री लाभ मिळावा हा उद्देश या कार्यक्रमामागचा आहे.
या कार्यक्रमात तहसील कार्यालय, पंचायत समिती तालुका कृषी कार्यालय, पंचायत समिती शिक्षण विभाग, बांधकाम विभाग,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, महिला व बाल विकास विभाग,आरोग्य विभाग,
पोलिस प्रशासन, भूमी अभिलेख, पशुधन विकास, नगरपरिषद,ग्रामीण पाणी पुरवठा, उजनी कालवा क्र. ९ व ५२, दुय्यम निबंधक कार्यालय, वन परिक्षेत्र, रो.ह.यो. कार्यालय, सामाजिक वनीकरण,
क्रीडा विभाग, एस. टी. महामंडळ आदीवासी विकास, प्रादेशिक परिवहन,राज्य उत्पादन शुल्क आदी विभागाशी नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज