मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सांगली -सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधीत झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्यासाठी सात हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणातील 200 पानांचे आरोपपत्र 58 दिवसात तपासीक अंमलदार तथा पो.नि.उमेश महाडीक यांनी पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले आहे.
दरम्यान, उमेश महाडीक यांनी सखोल चौकशी करुन पुराव्यासह तपास केल्याने या घटनेला भक्कमता आली असुन लाचखोर सुरज नळे याने जेलमध्ये राहून एक वेगळी नोंद नावावर केली आहे. लाच प्रकरणात आत्तापर्यंत जास्तीत जास्त दिवस कारागृहात बसणारे आरोपी असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची हकीकत अशी, सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधीत झालेल्या गट क्रमांक 52 कमलापूर येथील पाईपलाईनची मंजूर रक्कम 1 लाख 43 हजार 794 रुपये शेतकर्याला देण्यासाठी यातील
आरोपी तलाठी सुरज रंगनाथ नळे यांनी झीरो कर्मचारी पंकज चव्हाण यांच्या मध्यस्तीने दिनांक 29 मार्चच्या रात्री 10.15 वाजता सात हजाराची लाच स्विकारताना सोलापूरच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते.
याचा तपास पोलीस निरीक्षक उमेश महाडीक यांनी करुन तब्बल 200 पानांचे आरोपपत्र तयार केले. तसेच प्रथमच 58 दिवसात न्यायालयात ते सादर केले आहे.
आरोपी नळे याने जामीन मिळावा यासाठी पंढरपूर न्यायालयात प्रथम अर्ज ठेवला होता. मात्र शासकीय अधिकार्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाल्याने ही गंभीर बाब लक्षात घेवून न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.
तद्नंतर नळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून तेथेही अर्ज दाखल केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने घटनेचे गांभीर्य ओळखून जामीन अर्ज फेटाळला.
दरम्यान आरोपी तलाठी नळे व दलालवाला हे दोघेही घटना घडल्यापासून ते आजतागायत कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. लाच प्रकरणात आत्तापर्यंत जास्तीत जास्त दिवस कारागृहात बसणारे आरोपी असल्याचे सांगण्यात आले.
तपासीक अंमलदार पो.नि.उमेश महाडीक यांनी सखोल चौकशी करुन पुराव्यासह तपास केल्याने या घटनेला एक भक्कमता आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज