mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पावसाचा विजय! चेन्नई सुपर किंग्स-गुजरात टायटन्स फायनल स्थगित; ‘या’ दिवशी होणार लढत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 28, 2023
in मनोरंजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. सायंकाळी ६ वाजल्यापासून अहमदाबाद येथे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने अखेर ९ वाजता विश्रांती घेतली.

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज अंतिम सामना येथे खेळवला जाणार आहे. पण, चाहत्यांना खूपच वाट पाहावी लागत आहे. पावसाने १५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा हजेरी लावली.

पावसासोबत अहमदाबादमध्ये काही भागात गाराही पडल्या. मुसळधार पावसामुळे अखेर आज होणारा सामना स्थगित केला गेला अन् उद्या ही फायनल सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

९ वाजता थांबला, परंतु १५ मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा धो-धो पाऊस सुरू झाला आहे. अम्पायर्स मैदानाची पाहणी करत असताना पावसाची पुन्हा एन्ट्री झाली. पाऊस थांबण्याचं नाव घेत नसल्याने अखेर आजची मॅच उद्या खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

दोन्ही संघांनी ५-५ षटकांचा सामना खेळण्यास नकार दिला. किमान १०-१० षटकं त्यांना खेळायची होती, परंतु परिस्थिती पाहता ते शक्य नसल्याने आजचा सामना स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

अम्पायर रॉड टकर यांनी दिलेल्या माहितीनुसार १२.०६ पर्यंत सामना होऊ शकला असता, परंतु त्यासाठी किमान एक तास आधी पाऊस थांबावला हवा होता. पण, ११ नंतरही पाऊस सुरू राहिल्याने हा निर्णय घेतला गेला.

राखीव दिवस असणार?

दरम्यान हे लक्षात घ्या की आयपीएल 2022 मध्ये अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस होता, अशातच यंदाही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. अंतिम सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होणार असून जर

या वेळेत पाऊस पडला तर 09.35 पर्यंत खेळ सुरू झाल्यास षटकांमध्ये कोणतीही घट होणार नाही. तसेच यानंतरही, जर हवामानाने फटका दिला तर 5-5 षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफ वेळ 11.56 पर्यंत असणार आहे.

एकही चेंडू न टाकल्यास काय होईल?

आज कमीत कमी पाच षटकांचा सामना खेळला गेला नाही, तर सामना राखीव दिवशी म्हणजे 29 मे ला होणार आहे. समजा राखीव दिवसातही निर्णय झाला नाही, तर गुजरात टायटन्सचा संघ विजेतेपद पटकावणार होता.

कारण गुजरात टायटन्सने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले असून चेन्नई सुपर किंग्सने दुसरे स्थान पटकावले आहे. अशातच एकीकडे गुजरातने 14 पैकी 10 सामने जिंकले आणि 20 गुण मिळवले तसेच त्यांचा 0.809 चा नेट-रन रेट होता. तर दुसरीकडे, सीएसकेने 14 पैकी 8 सामने जिंकले होते आणि त्यांचे 17 गुण होते.

हे प्लेऑफचे नियम

आयपीएल खेळण्याच्या परिस्थितीनुसार, फायनल, एलिमिनेटर, क्वालिफायर-1, क्वालिफायर-2 सामना टाय राहिला तर आणि निकाल लागला नाही तर हे नियम लागू होणार आहेत.

16.11.1: अंतिम फेरीतील विजेता ठरवण्यासाठी संघ सुपर ओव्हरमध्ये एकमेकांशी खेळतील

16.11.2: सामन्यात सुपर ओव्हर शक्य नसेल, आयपीएलच्या खेळण्याच्या परिस्थितीच्या परिशिष्ट एफ अंतर्गत विजेता निश्चित करण्यात येणार आहे. परिशिष्ट एफ नुसार, लीग टप्प्यात गुणतालिकेत जो संघ अव्वल असतो तो विजेता घोषित करण्यात येतो.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आयपीएल 2023

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

February 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

काय सांगताय..! बायकोने दीड कोटींना नवरा विकला, गर्लफ्रेंडने पैसे मोजताच दिला ‘हँडओव्हर’; ‘जुदाई’च्या रियल लाइफ स्टोरीची गावभर चर्चा

February 15, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा; एका कॉलवर प्रश्न सुटणार

January 26, 2026
सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ

सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ

January 8, 2026
Next Post
प्रांताधिकारी यांची कसून चौकशी सुरू, लाचखोर नळे प्रकरण गाजनार; अँटी करप्शन अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाचे पुरावे? मोठा मासा गळाला लागणार

खळबळजनक! मंगळवेढ्यातील तरुणाची  चिट्टी लिहून आत्महत्या; मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तीघांविरूध्द गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 6, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा