मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर शहरातील होटगी रोडवरील गजानन नगरातील २४ वर्षीय तरुणाची ऑनलाईनच्या माध्यमातून एक लाख पाच हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. असिफ आयुब शेख याच्या फिर्यादीवरून एका अनोळखी मोबाईल क्रमांक व टेलिग्रामवरील अण्णा नावाच्या युजरवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, आसिफने २७ एप्रिल रोजी त्याच्या मोबाईलमधील टेलिग्रामवर वर्क फ्रॉम होम म्हणून स्टेटस पाहिला. त्यावर त्याने क्लिक केले आणि त्यातील अनोळखी मोबाईल क्रमांकावर मेसेज करून बोलला.
त्यावेळी समोरील अनोळखी व्यक्तीने घरबसल्या दररोज दोन ते २० हजार रुपये कमवता येतील, असे सांगितले. तेव्हा आसिफने त्या अनोळखी व्यक्तीला त्यांच्याबद्दल माहिती विचारली.
अॅमेझॉन कंपनीत हायरिंग मॅनेजर व ॲमेझॉन पार्टनर असल्याचे सांगून विश्वास संपादित केला. त्यानंतर तुम्ही कोठे असता, कोठे राहता अशी माहिती आसिफने विचारली. त्या व्यक्तीने असिफला व्हाट्सअॅपवर संपूर्ण माहिती पाठवली.
त्याचबरोबर एक लिंक देखील पाठवली. त्यावर क्लिक करून ती लिंक ओपन करायला सांगितले. क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशनचे पेज उघडले.
त्यात माहिती भरून झाल्यावर पासवर्डही आसिफने टाकला. त्यानंतर अनोळखी व्यक्तीने असिफला टेलिग्रामवर मेसेज केला. त्यावर क्लिक केल्यावर अण्णा नावाची टेलिग्राम युजरवर एका मुलीचा फोटा दिसला.
कामाची पद्धत व स्टेप सांगून झाल्यावर तिसऱ्या स्टेपमध्ये क्युआर कोड पाठवला. तो स्कॅन करून पेमेंट करायला सांगितले. तिसऱ्यावेळी दोन हजार रुपये भरायला सांगितले. अशाप्रकारे असिफला तीनवेळा दोन हजार रुपये पाठवायला सांगितले. असिफ पैसे भरत गेला.
फसवणूक झाल्याची खात्री होताच आसिफने विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज