मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । विकास म्हणजे केवळ बांधकामे नसून वन , वन्यजीव आणि जंगल संवर्धनासाठी हे सरकार कटिबध्द आहे. त्यामुळे पर्यावरणाची किंमत मोजून आणि जंगलाचे नुकसान करून प्रकल्प राबवण्याचे कोणतेही सोपे मार्ग निवडण्यात येऊ नयेत,असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. हा विषय अतिशय संवेदनशीलपणे आणि काळजीपूर्वक हाताळला पाहिजे,असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. वनक्षेत्रात एलिव्हेटेड ट्रेनचा विचार करा पर्यावरणाची किंमत मोजून प्रकल्प नको म्हणूनच अकोला – खांडवा मीटर गेज रेल्वेलाईनचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्याच आला तेव्हा मेळघाटमधून जाणाऱ्या या प्रकल्पासाठी पर्यायी मार्ग बदलण्याचे राज्याचे मत केंद्र शासनाला कळविण्यात आले. हा पर्यायी मार्ग निवडल्यास वाघ व वन्यजीवांचे संरक्षण तर होईल , असे मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर – नागभीड रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करताना त्या ठिकाणी एलिव्हेटेड ट्रेन करणे शक्य आहे का , याचा विचार करण्याची आवश्यकताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे झालेल्या या बैठकीला वनमंत्री संजय राठोड , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार धीरज देशमुख यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य , वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Do not implement projects at the expense of the environment! Chief Minister Uddhav Thackeray’s instructions
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज