मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
गोठ्यात बेडवर झोपलेल्या एका 43 वर्षीय महिलेची साडी ओढून तिला मिठीत घेत मनाला लज्जावाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी तानाजी बाबासाहेब जाधव (रा.सलगर बु॥) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील 43 वर्षीय फिर्यादी महिला दि.10 एप्रिल रोजी हातउसणे दिलेले पैसे आरोपीकडे मागितले होते.
आरोपीने सलगर येथील विदर्भ कोकण बँक या शाखेचा चेक फिर्यादीस दिला होता. आरोपीने फिर्यादीस भेटून सांगितले की, मी सांगितल्याशिवाय चेक जमा करु नका.
मी सांगेल तेव्हांच बँकेत जमा करा म्हटल्यावर दि.7 मे रोजी सकाळी 9.30 वाजता फिर्यादीने पैशाची गरज असून तो चेक बँकेत टाकणार असल्याचे सांगून राहते घरी त्या गेल्या.
सकाळी 11 वाजता फिर्यादी ही जनावर्याच्या गोठ्यात बेडवर झोपली असताना आरोपीने तेथे येवून फिर्यादीची साडी ओढू लागला.
यावर फिर्यादीने साडी का ओढतोस असे म्हणताच त्याने पुन्हा ब्लाऊज ओढून फाडला व शिवीगाळ करीत मिठीत घेवून मनास लज्जावाटेल असे कृत्य केले.
या दरम्यान फिर्यादीने आरडाओरडा करताच आरोपीने तिच्या पोटावर लाथ मारुन निघून जाताना तू घडला प्रकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर बघून घेण्याची धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज