मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
उन्हाच्या कडाक्याने उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत असताना आता उजनी जलाशयाच्या उजव्या कालव्याचा उंच सेतू फुटल्यामुळे दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ आली आहे. कालव्यातून पाण्याची प्रचंड गळती झाली.
माळशिरस तालुक्यातील संगमजवळ हा प्रकार घडला असून तब्बल २४ तासांनंतर पाण्याची गळती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने हालचाल सुरू केली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतीपिकांसाठी उजनी उजव्या कालव्यावाटे पाणी सोडले जात असताना कालव्याचा सेतू फुटून पाणी गळती सुरू झाली.
पंढरपूर-मंगळवेढा भागासाठी कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होताना तेथे धबधब्याचे स्वरूप आले होते.
गळतीमुळे धबाधब्यासारखे खाली कोसळणारे पाणी कालव्याच्या परिसरातील शेतांमध्ये घुसले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांवर संकट कोसळले.
तर मंगळवेढा भागातील शेतीपिके पाण्याअभावी करपून चालली असताना त्यात कालवा फुटल्यामुळे मंगळवेढा भागातील शेती हक्काच्या पाण्यावाचून धोक्यात आली आहे.
जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. माहिती प्राप्त होताच संबंधित यंत्रणा धावून येत कालव्याची गळती दूर करणे अपेक्षित होते.
परंतु त्याचे गांभीर्यच नसल्याने २४ तासांपेक्षा अधिक वेळ फुटलेल्या कालव्यातून कोट्यवधी लिटर पाणी वाया गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज