टीम मंगळवेढा टाईम्स ।
लवंगीच्या माळरानावर अनिल सावंत यांनी नंदनवन फुलवले असून त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
अनिलदादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत, ऋतुराज सावंत डॉ.आदित्य सावंत व इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, भैरवनाथ शुगरचे प्रमुख आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत, शिवाजीराव सावंत व अनिल सावंत यांच्या माध्यमातून लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
लवंगी येथील कारखान्याची जबाबदारी अनिल सावंत हे पाहत आहेत ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत.
अनिल सावंत यांच्या मित्र परिवारांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले आहेत हे कौतुकास्पद असल्याचे शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले.
भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन मा.अनिल(दादा) सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त किर्तन सोहळा संपन्न
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा.चेअरमन अनिल(दादा) सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य लवंगी येथे झी टॉकीज फेम ह.भ.प.भागवताचार्य रूपालीताई सवने यांचे किर्तन झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन अनिल(दादा) सावंत मित्र मंडळ लवंगी यांनी केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. रूपालीताई सवने यांचा सत्कार लवंगीचे माजी सरपंच सरस्वतीताई निकम यांनी केला.
सावंत कुटुंबीयांनी लवंगी च्या माळरानावर नंदनवन फुलवले असे गौरव उद्गार ह.भ.प. रूपालीताई सवने यांनी काढले.
यावेळी व्हा.चेअरमन मा.अनिल(दादा) सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमास लवंगी व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घेतला. या भागात असा धार्मिक कार्यक्रम पहिल्यांदाच झाला आहे. त्यामुळे भाविकमध्ये आनंदाचे वातावरण होते.
किर्तन सोहळ्यामध्ये भैरवनाथ शुगरचे जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, लवंगीचे सरपंच डॉ.कृष्णांत माने, आप्पा माने-सरकार, चंद्रकांत देवकर गुरुजी, इंद्रजीत पवार, तानाजी चव्हाण, रामचंद्र जाधव, अशोक निकम, सरपंच तानाजी जाधव, शशिकांत निकम,
सरस्वतीताई निकम, रामकृष्ण चव्हाण, तानाजी पवार, बालगिरी गुगवाड, मच्छिंद्र खताळ, गुलाब थोरबोले, महादेव देवकर, सुरेश पवार, शिवाजी जाधव, सुरेश गोणे, बंडु शेणवे, भगरे, शिवशंकर भांजे, समीर जाधव, लाला शेख, दर्याप्पा हडसंग, शिवाजीराव चव्हाण,
सचिन घाटगे, तानाजी खडतरे, शाहीर शेख, मायाप्पा पांढरे, पिंटू खडतरे, सुभाष वाघमारे व पत्रकार बांधव तसेच भैरवनाथ शुगरचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मा.आनिल(दादा) सावंत यांचा सत्कार मा.अनिल(दादा) सावंत मित्र मंडळ लवंगी यांनी केला. सूत्र संचालन श्री येडवे गुरुजी यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज