टीम मंगळवेढा टाईम्स । प्रशासकीय अधिकारी ऐकत नसतील आणि तुमचं कामं होतं नसेल तर दंगा करा. भीक मागितलं तर कोणी देत नाही, अधिकार हिसकावून घ्यावे लागतात, असा अजब सल्ला महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनीही ठाकूर यांचेच अक्षर गिरवले.
बाळसाहेब थोरात म्हणाले की, शासकीय कार्यालयात जाताना सोबत चार-पाच जणांना घेऊन जा. आपण कार्यकर्ते म्हणून जाताना जरा एकजुटीनं गेलं पाहिजे, दोन-चार पोरं या बाजूला, दोन-चार पोरं दुसऱ्या बाजूला घेऊन गेलं की सगळं व्यवस्थित चालतं.
सोलापूर येथे सदर मंत्री महोदय करोना परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असताना कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी मिटिंगमध्ये त्यांनी हा अजब गजब सल्ला दिला आहे.
त्यांच्या या सल्ल्याने सगळेच चक्रावून गेले आहेत. यानंतर मात्र थोरात यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत स्पष्टीकरण दिले की, काम करण्यासाठी पैसे घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नैतिक धाक असायला हवा, अशा अर्थाने आपण ते बोललो होते.
सोबत चार–पाच जणांना घेऊन जा :
बाळासाहेब थोरात
‘आम्ही इतके जिल्हे फिरलो, मात्र ही तक्रार पहिल्यांदा ऐकायला मिळाली, आपले लोक तिथल्या तिथे बंदोबस्त करतात. त्यामुळे आपलं कुठतरी चुकतंय हे लक्षात घ्या. आपला धाक हा असला पाहिजे. धाक निर्माण करण्याची गरज जनतेची, कार्यकर्त्याची असली पाहिजे. चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्यावर आपला धाक असला पाहिजे. आपण कार्यकर्ते म्हणून जाताना जरा एकजुटीनं गेलं पाहिजे, दोन-चार पोरं या बाजूला, दोन-चार पोरं दुसऱ्या बाजूला घेऊन गेलं की सगळं व्यवस्थित चालतं’ असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.
या बैठकीनंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना विषयक घडामोडींचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत थोरात आणि यशोमती ठाकूर यांना त्यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, कामासाठी पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर नैतिक धाक असला पाहिजे. या अर्थाने आपण हे विधान केल्याचे स्पष्टीकरण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
‘If there is no work, then riot’ Minister Yashomati Thakur’s strange advice to the workers
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज