टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा प्रांत कार्यालयातील लाचखोर तलाठी सुरज नळे यांनी लाच घेतल्यानंतर अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालून तो फरार झाला आहे.
लाचखोर तलाठी नळे याने अंगावर गाडी घातल्यामुळे अँटी करप्शन अधिकाऱ्याच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, आरोपी सूरज नळे याने अंगावर घातलेली गाडी अँटी करप्शन विभागाने जप्त केली आहे. लाचखोर तलाठी सुरज नळे याने सांगोला व मंगळवेढ्यात धुमाकूळ घातला होता. अनेक शेतकऱ्यांचे कोरे चेक घेतल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा प्रांत कार्यालयात हायवेच्या भूसंपादन मोबदला वाटपाचे काम पाहणाऱ्या तलाठी सुरज रंगनाथ नळे यांने ७ हजार रुपयांची लाच घेतली असून त्याने लाचेची रक्कम घेऊन घटनास्थळावरून फिल्मी स्टाईलने धूम ठोकली आहे.
दरम्यान खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण यास एसीबीने गजाआड केले आहे. याप्रकरणी तलाठी सुरज रंगनाथ नळे व खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण या दोघांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
या लाचखोरीत वरिष्ठ अधिकारी कोण कोण सामील आहेत हे तलाठी नळे याच्या अटकेनंतर समोर येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रार याने मित्राच्या शेतजमिनीमधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ सांगली-सोलापूर असा महामार्ग गेलेला असून त्यामध्ये शेतजमिनीमध्ये असलेली पाईपलाईन बाधित झाली आहे.
त्यामुळे सदर पाईपलाईनची शासकीय नुकसान भरपाई १,४३,७९४/- रुपये मंजूर झाले असून सदर नुकसान भरपाई मिळने करिता तक्रारदार त्यांच्या मित्राच्या वतीने पाठपुरावा करीत होता.
यातील आरोपी खाजगी इसम चव्हाण याने आरोपी सूरज नळे यांच्या वतीने लाचेची मागणी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज