टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर ग्रामीण पोलिस आस्थापनेवर सुरू असलेल्या पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये शारिरिक चाचणीमधून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची रविवार २ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता लेखी परीक्षा होणार आहे.
ही परीक्षा सिंहगड पब्लिक स्कुल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, बिल्डींग नंबर १, सोलापूर-पुणे हायवेवर, केगांव येथे सकाळी ८.३० ते १० वाजेपर्यंत होणार आहे.
त्यासाठी विद्यार्थ्यांनी सकाळी ६.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहच व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.
शारिरिक चाचणीमधून लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. शिवाय लेखी परीक्षेचे प्रवेशपत्रही देण्यात आले आहे.
लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांपैकी ज्यांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र मिळाले नाही, त्यांनी सोलापूर ग्रामीण पेालीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
सर्व उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी वेळेमध्ये हजर राहणे बंधनकारक आहे, परीक्षा सुरू झाल्यानंतर आलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही,
उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना ओळखपत्र सोबत आणावे, उमेदवारांना पॅड व काळ्या शाईचे पेन परीक्षेवेळी पुरविले जाणार आहे, त्यामुळे परीक्षा केंद्रावर कोणतेही साहित्य घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज