mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 21, 2023
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
अट्टल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

टीम मंगळवेढा टाईम्स। 

ठिकाणांवरून रात्रीच्यावेळी घरासमोरील लावलेल्या मोटार सायकली चोरल्याप्रकरणी अर्जून भारत पवार (वय 28, रा.कव्हे कुर्डूवाडी ता.माढा) व राहूल नारायण भोसले (वय 24, रा. धर्मगांव ता. मंगळवेढा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

त्यांचेकडून आतापर्यंत एकूण 12 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे मार्गदर्शनाखाली मालाविषयी गुन्हयाची उकल करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथक टेंभूर्णी शहरात हजर असताना

त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, कव्हे कुर्डूवाडी ता. माढा येथील इसम हे चोरलेल्या मोटार सायकली विकण्याकरीता शेटफळ ता. मोहोळ येथील हाॅटेल नयन येथे येणार असल्याबाबत खात्रीशिर बातमी मिळाल्याने

पोसई शैलेश खेडकर व त्यांचे पथक हे टेंभूर्णी येथून निघून बातमी प्रमाणे शेटफळ येथील हाॅटेल नयन समोर येवून सापळा लावले असता काही वेळाने बातमीप्रमाणे 2 इसम विनानंबर प्लेटच्या मोटार सायकलसह सदर ठिकाणी आल्याचे दिसले,

बातमी प्रमाणे त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जात मिळून आलेले मोटार सायकलचे कागदपत्रा बाबत चैकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले.

त्यांचेकडे कौशल्यपुर्ण विचारपूस करून तपास करता त्यांनी सांगितले की, आज सुमारे 10 दिवसापूर्वी 01 मोटार सायकल ही कुर्डूवाडी येथील बारलोणी येथून रात्रीच्या वेळी एका घरासमोरून चोरी केली असलेबाबत सांगितले.

त्याबाबत कुर्डूवाडी पोलीस ठाणे गुरंन 111/2023 भादविकाक 379 प्रमाणे गुन्हा दाखल असून, त्यास आणखीन विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने सांगितले की, मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी

इचगांव ता. मोहोळ जि. सोलापूर येथून रात्रीच्या वेळी घरासमोरून 01 होंडा  शाईन मोटार सायकल चोरली असल्याचे सांगितले त्याबाबत खात्री केली असता, कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

त्याप्रमाणे त्यांनी मागील 2 ते 3 वर्षांपासून मंगळवेढा, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, परांडा उस्मानाबाद, चडचण कर्नाटका इत्यादी ठिकाणांवरून रात्रीच्यावेळी घरासमोरील लावलेल्या मोटार सायकली त्यांचे इतर साथिदार यांनी मिळून चोरल्याचे सांगितले आहे.

त्यांचेकडून आतापर्यंत एकूण 12 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून सोलापूर ग्रामीण जिल्हयातील एकूण 07 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

इतर 5 मोटार सायकलीबाबत संबंधीत मोटार सायकल मालकांशी संपर्क करून माहिती घेण्याचे काम चालू आहे. तरी सदर आरोपीतांकडून 12 मोटार सायकलीसह एकूण 05 लाख 40 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपीस कामती पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असून त्यांचेकडून आणखीन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सोबत 12 मोटार सायकलचे आर.टी.ओ नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर बाबत माहिती जोडली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक  हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप,यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. शैलेश खेडकर, सफौ/ख्वाजा मुजावर,

पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अनिस शेख, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे चालक समीर शेख यांनी बजावली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मोटारसायकल

संबंधित बातम्या

गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
Next Post
श्री सिद्धनाथ अर्बन निधी या बँकेचे आज गोणेवाडीत उद्घाटन; खाते उघडून आकर्षक ‘या’ योजनांचा लाभ घ्या

श्री सिद्धनाथ अर्बन निधी या बँकेचे आज गोणेवाडीत उद्घाटन; खाते उघडून आकर्षक 'या' योजनांचा लाभ घ्या

ताज्या बातम्या

गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..