टीम मंगळवेढा टाईम्स ।
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती मोबाइल क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन राज्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
कृषिमंत्र्यांनी स्वत:च्या बंगल्यावरील आणि कार्यालयातील मोबाइल नंबर जाहीर केले असून शेतकऱ्यांनी नुकसान आणि वादळी पावसाची माहिती व फोटो नंबरवर पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषिमंत्र्यांनी केला मोबाइल नंबर जाहीर
कृषिमंत्री सत्तारांचा ९४२२२०४३६७ मोबाईल क्रमांक आहे. तर ०२२-२२८७६३४२, ०२२-२२८७५९३० अशी दोन कृषिमंत्र्यांच्या कार्यालयातील संपर्क क्रमांक आहेत.
तसेच कृषिमंत्री सत्तारांनी शासकीय निवासस्थानाचा ०२२-२२०२०४३३ नंबर जाहीर केला आहे.
मागील आठ दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा शेतकऱ्यांना बसतो आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री सत्तारांनी नंबर जाहीर केले आहेत.
राज्याच्या विविध भागात गारपीट आणि वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पीक हातचे गेले आहे.
तसेच झाडे उन्माळून पडणे, वीज पडून मृत्यू होणे, जनावर दगावणे, वीजपुरवठा खंडित होणे, असे प्रकार राज्यभर घडत आहेत.
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधीपक्षाने केली आहे.
शुक्रवारी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या गलथान कारभारवर आसूड ओढले.
“राज्यातील शेतकऱ्यांकडे सरकार लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. कृषिमंत्री तर वाचाळवीरासारखी बडबड करत असतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांबद्दल अत्यंत असंवदेनशील विधान करतात,” असे पवार म्हणाले.
विरोधीपक्षनेते अजित पवारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “पंचनाम्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत.”
दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यातील विविध जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज