mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गरुडभरारी! धाडस आणि विश्वास याच्या जोरावरच एल के पी मल्टीस्टेट यशाचे शिखर गाठेल; प्रा.नितीन बानुगडे पाटील

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 17, 2023
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण होत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन प्रांतांचा निकटचा संबंध आला होता. रयत आणि मावळे यांचा अपार  विश्वास तसेच प्रचंड धाडस याच्या जोरावरच छत्रपतींनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य उभा केले.

महाराजांचा इतिहास फक्त वाचून आणि ऐकून चालणार नाही तर त्याप्रमाणे आपण आपली वाटचाल केली तर नक्कीच मराठी पाऊल पुढे पडल्याशिवाय राहणार नाही.

हाच ऐतिहासिक वारसा नजरे समोर ठेवत या ठिकाणी चेअरमन अनिलभाऊ इंगवले आणि त्यांचे सवंगडी डॉ.बंडोपंत लवटे , जगन्नाथ भगत गुरुजी व सुभाष दिघे गुरुजी यांनी समाजातून खूप मोठा विश्वास संपादन करत व प्रचंड धाडस दाखवत अर्थविश्वातील सहकाराचा यज्ञ प्रज्वलित केलेला आहे.

यामुळे एल के पी मल्टीस्टेट ही संस्था निश्चितच यशाचे शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही. तसेच या मल्टीस्टेटच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन राज्यांमध्ये अनेक शाखांच्या माध्यमातून घेत असलेली गरुडभरारी ही कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व इतिहासाचे अभ्यासक प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.

भोसे तालुका मंगळवेढा येथे एल के पी मल्टीस्टेटच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

शकुन आणि अपशकुन यांच्या फेऱ्यात न अडकता  “केल्याने होत आहे रे अधि केलेची पाहिजे “असे सांगत मराठी माणसाला उद्योग आणि व्यवसायामध्ये आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी व त्याचे मन , मेंदू आणि मनगट बळकट करण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून मदतीचा हात देत

इतरांसमोर विकासाचा दीपस्तंभ म्हणून केले जाणारे या उद्योग समूहाचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करत आणि छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अनेक रोमांचकारी प्रसंग हुबेहूब समोर उभा करत व दैनंदिन जीवनातील कितीतरी मार्मिक दाखले देऊन मौलिक मार्गदर्शन करत बानुगडे पाटील यांनी उपस्थितांना सव्वा तासाहून अधिक काळ मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक तथा मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती तानाजीभाऊ काकडे होते.

यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जयसिंगतात्या पाटील, भोसे गावच्या सरपंच सुनीताताई ढोणे, दामाजी कारखान्याचे संचालक बसवेश्वर पाटील, शिरनांदगी चे सरपंच गुलाबराव थोरबोले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी प्रास्ताविकामध्ये एल के पी मल्टीस्टेटचा विस्तार, संस्थेची कार्यपद्धती, ठेवीदारांसाठी असलेल्या आकर्षक योजना आणि विविध प्रकारच्या कर्ज योजना सांगत पुढील ध्येय, धोरणे व दिशा स्पष्ट केली.

संस्थेच्या प्रगतीला ज्यांचा ज्यांचा हातभार लागला आहे अशा सर्व ग्राहकांचे ऋण व्यक्त केले. तसेच सांगोला तालुका व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये सूर्योदय उद्योग समूहाची गेल्या तेरा वर्षातील वाटचाल आणि चढता आलेख स्पष्ट करत सभासद बांधव व ग्राहकाकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी भोसे गावचे उद्योजक प्रकाश पाटील बोलताना म्हणाले की दोन राज्य कार्यक्षेत्र असलेल्या एवढ्या मोठ्या मल्टीस्टेट ची शाखा आपण आमच्या भोसे गावामध्ये काढली ही गोष्ट आमच्यासाठी गौरवास्पद आहे.

या शाखेमुळे आमच्या गावासह आजूबाजूच्या बारा ते पंधरा गावांतील छोट्या मोठ्या व्यवसायिकांची मोठी सोय झाली असून ही संस्था समृद्ध होण्यासाठी  लागेल  तितके सहकार्य करण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

युवक नेते बसवेश्वर पाटील तसेच गुलाबराव थोरबोले यांनी देखील  या मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले व त्यांचे संचालक मित्र तसेच सूर्योदय परिवाराची विश्वासार्हता व धडाडीचे कौतुक करत मल्टीस्टेटक्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन, बानगुडे पाटलांचा अंगावर शहारे आणणारा धगधगता विचार, हलग्यांचा कडकडाट, कोल्हापुरी फेट्यांचा साज  व कार्यक्रमासाठी जमलेली अलोट गर्दी यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला असल्याच्या भावना यावेळी अनेकांनी बोलून दाखवल्या.

शेवटी आभार सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक जगन्नाथ भगत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एलकेपी मल्टीस्टेट व सूर्योदय अर्बनचे अधिकारी तसेच भोसे शाखेचे शाखा व्यवस्थापक चंदन  खांडेकर, बाळासाहेब सूर्यवंशी, सागर पाटील, दुर्योधन चौगुले,सखाराम चौगुले,रविराज पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: एल के पी मल्टिस्टेटभोसे

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 15, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
Next Post
मंगळवेढ्यात शासकीय हमीभाव खरेदी केंद्राचा आज शुभारंभ; ‘हा’ संदेश प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी घेऊन या

दामाजीच्या सभासदांना साखर 10 रुपये प्रमाणेच मिळावी; संचालक सिद्धेश्वर आवताडे यांचा दरवाढीला विरोध

ताज्या बातम्या

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा वाढली! जूनचा हप्ता जमा न झाल्याने महिलांची बँकेत चकरा; कधी मिळणार पैसे? लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता अडकू शकतो

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा