टीम मंगळवेढा टाईम्स ।
कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, सभासद व कामगार सुरक्षीत राहिला पाहिजे या उद्देशाने सभासदांना सवलतीचे दराने दिली जाणारी साखर यापुढे प्रति किलो 20 रुपये या दराने दिपावली व पाडवा या सणाकरिता प्रती शेअर्स २५ किलो चांगल्या प्रतीची साखर देण्याचा निर्णय संचालक मंडळाचे झालेल्या सभेत घेतला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक सभासद-शेतकरी, कर्मचारी, तोडणी वाहतुक ठेकेदार, हितचिंतक यांनी आमचे संचालक मंडळावर विश्वास ठेवून ऊस पुरवठा केलेने सर्वांच्या सहकार्याने कारखाना दिडपट क्षमतेने चालविला आहे.
त्या विश्वासास पात्र राहून आजपर्यंत सभासदांची ऊस बिले, तोडणी ठेकेदारांची बिले, कामगार पगार या संचालक मंडळाने वेळेवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हंगामाचे सुरुवातीला कारखान्याची सर्व बँकांची खाती थकीत असलेने विद्यमान संचालक मंडळाने स्वतःचे ७/१२ उताऱ्यावर कर्ज काढून कारखाना सुरु केला आहे.
आपल्या कारखान्यासमोर असणाऱ्या आर्थिक अडचणी व मागील कर्जाचा बोजा मोठया प्रमाणात आहे.
कारखान्यासमोरील आर्थिक अडचणीचा विचार करुन कारखान्याचे कर्मचारीबंधुनीही ऑफ सिझनमधील कामकाजासाठी कर्मचारी व वेतन कपात करणेसाठी नेहमीप्रमाणेच सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
आपल्या कारखान्याचे पूर्वीचे ३० हजार व नवीन झालेले १० हजार असे आजअखेर ४० हजाराचे वर सभासद आहेत.
कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, सभासद व कामगार सुरक्षीत राहिला पाहिजे या उद्देशाने सभासदांना सवलतीचे दराने दिली जाणारी साखर यापुढे प्रति किलो रु।२०/- या दराने दिपावली व पाडवा या सणाकरिता प्रती शेअर्स २५ किलो चांगल्या प्रतीची साखर देण्याचा निर्णय संचालक मंडळाचे दि।१५/३/२०२३ रोजी झालेल्या सभेत घेतला आहे.
यासाठी सभासदांचे शेअर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. तरी सर्व सभासद बांधवानी दामाजी कारखान्याचे स्थैर्य व प्रगतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअमन शिवानंद यशवंत पाटील व व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात यांनी केले आहे.
सदर प्रसंगी चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले कि, मागील वार्षिक सभेच्या प्रसंगी सभासदांनी साखरेचा दर वाढविला तरी चालेल परंतु चांगल्या प्रतीची साखर सभासदांना द्यावी अशी लेखी मागणी केली होती.
तसेच आपल्या सोलापूर जिल्हयातील सर्व सहकारी साखर काखान्याचे सभासदांना सवलतीचे दराने दिली जाणारी साखर सुमारे २५ ते ३० रुपये प्रति किलो या दरम्यानचे दराने दिली जाते.
या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हयातील सहकारी साखर कारखान्याचे तुलनेने आपले सभासदांना दिली जाणारी साखर कमी दराने म्हणजे प्रति किलो २० रुपये या सवलतीचे दराने दिवाळी व गुढीपाडव्याचे सणाला प्रत्येकी २५ किलो चांगल्या प्रतीची साखर देण्याचा निर्णय या संचालक मंडळाने घेतला आहे.
संचालक मंडळाचे ठरलेल्या धोरणाप्रमाणे येणाऱ्या गुढीपाडवा सणाकरिता दि.१८ मार्च ते दि.२२ मार्च या कालावधीत सकाळी १० ते सायं ५ या वेळेत खालील प्रमाणे साखर वाटप केंद्रावरुन साखर देण्याची व्यवस्था करणेत आली आहे.
तसेच संबंधीत केंद्रावर कारखान्याने ठरवून दिलेल्या वेळेत उचल न केलेल्या सभासदांची साखर कारखाना साईटवर सुट्टीचे दिवस सोडून दर शुक्रवारी दुपारी २ ते ५ या वेळेत डिसेंबर, २०२३ अखेरपर्यंत वाटप केली जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी दिली आहे.
साखर वाटप केंद्र गांव
१) कारखाना साईट उचेठाण, बठाण, मुढवी, धर्मगाव, २) मंगळवेढा आùफिस नागणेवाडी मंगळवेढा शहर, ३) खोमनाळ नाका, (राजकिरण चौक) खोमनाळ, फटेवाडी, अकोला, ढवळस, धर्मगांव, ४) ब्रम्हपूरी ब्रम्हपूरी, मुंढेवाडी, ५) माचणूर रहाटेवाडी, तामदर्डी, माचणूर
६) बोराळे बोराळे, ७) सिध्दापूर सिध्दापूर, तांडोर, ८) अरळी अरळी, ९) डोणज डोणज, १०) नंदूर नंदूर, ११) मरवडे मरवडे, येड्राव, बालाजीनगर, कागस्ट, कात्राळ, कर्जाळ, डिकसळ, १२) हुलजंती सोड्डी, शिवणगी, पौट, येळगी, हुलजंती, १३) भोसे भोसे, शिरनांदगी,
१४) रड्डे रड्डे, जालिहाळ,सिध्दनकेरी, १५) नंदेश्वर नंदेश्वर, खडकी, जुनोनी, १६) हुन्नूर मानेवाडी, रेवेवाडी, हुन्नूर, १७) लोणार लोणार, महमदाबाद (हु), पडोळकरवाडी, १८) पाटखळ कचरेवाडी, डोंगरगाव, हाजापूर, खुपसंगी, पाटखळ, १९) शिरसी शिरसी, गोणेवाडी, लेंडवे चिंचाळे, २०) आंधळगांव आंधळगांव, गणेशवाडी, शेलेवाडी, लक्ष्मीदहिवडी, महमदाबाद (शे), गुंजेगांव
२१) मारापूर घरनिकी, मारापूर, मल्लेवाडी, देगांव, २२) सलगर बु। सलगर बु, लवंगी, सलगर खु।, आसबेवाडी, जंगलगी, २३) मारोळी मारोळी, २४) निंबोणी निंबोणी, खवे, जित्ती, बावची, चिक्कलगी,
२५) तळसंगी तळसंगी, भालेवाडी, हिवरगाव,भाळवणी
सदर प्रसंगी व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील,गौडाप्पा बिराजदार, प्रकाश पाटील,दिगंबर भाकरे,महादेव लुगडे, सिध्देश्वर आवताडे, अशोक केदार, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांचेसह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज