mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टिव्हलचे आयोजन; पाच दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 7, 2023
in मंगळवेढा, मनोरंजन
छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टिव्हलचे आयोजन; पाच दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

तुकाराम बीजेच्या मुहुर्तावर संपन्न होणाऱ्या मरवडे गावयात्रेचे औचित्य साधून छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टिव्हल सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या निमित्ताने दि.१० ते १४ मार्च या कालावधीत पाच दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक सुरेश पवार यांनी दिली.

मरवडे गावयात्रेतील कुस्तीच्या आखाड्याची सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. या यात्रेला जोडूनच छत्रपती परिवाराचे वतीने मागील २३ वर्षांपासून मरवडे फेस्टिव्हल सोहळा आयोजित केला जातो.

यंदाच्या या सोहळ्याला १० मार्च रोजी प्रारंभ होणार असून धनश्री पतसंस्थेचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे , शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या हस्ते उदघाटन संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिलबापू कादे हे भूषविणार आहेत.

उदघाटन सत्रानंतर शिवरंजनी प्रस्तुत  ‘गाणी तुमची आमची’ हा हिंदी-मराठी गीत संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भूदरगड (कोल्हापूर) येथील गुरुमाऊली प्रस्तुत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा मराठमोळा लोककलांचा अविष्कार सादर होणार असून या कार्यक्रमाचे उदघाटन आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान आ.समाधान आवताडे हे भूषविणार आहेत.

दि.१२ मार्च रोजी दु.१ वाजता स्वच्छंद आर्टसचे अमित भोरकडे हे ‘ कसे असावे सुंदर अक्षर ? कसे असावे शुद्ध अक्षर’ ? या विषयावरील कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

तर रात्री ८ मरवडे फेस्टिव्हल निमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण भैरवनाथ शुगरचे प्रा.शिवाजीराव सावंत, विठ्ठल शुगरचे अभिजित पाटील यांच्या हस्ते संपन्न होईल.

त्यानंतर प्रसिद्ध कवी प्रा.प्रशांत मोरे यांचा ‘ माय माझी ‘ हा काव्य अविष्कार सादर होणार आहे. तर दि.१३ रोजी दु. १ वाजता किरण बाबर हे ‘ मी वाचणारच  ‘या विषयांवर कार्यशाळा घेणार असून विद्यार्थी , पालक , शिक्षक व अंगणवाडीताई यांच्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

याच दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राच्या महागायिका कोमल पाटोळे व भैरव मार्तंड कलापथकाचा  ‘व्रत लोककलेच लेणं महाराष्ट्राचं ! ‘ हा कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी अॕड.नंदकुमार पवार , सिद्धेश्वर आवताडे , हणमंतराव दुधाळ इ.मान्यवर अतिथी उपस्थित राहणार आहेत.

दि.१४ रोजी दु. १ वा.  ‘प्रभावी सूत्रसंचलन’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून  अभिनव अकॕडमीतील सहकारी वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

पाच दिवस चालणाऱ्या  या सोहळ्याची सांगता महाराष्ट्रातील नामवंत नृत्य कलावंतांच्या सहभागातून सजलेल्या  ‘नृत्यजल्लोष ‘ या कार्यक्रमाने होणार असून यावेळी माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे , भगिरथ भालके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा सर्व रसिकांनी आनंद घ्यावा व अधिक माहितीसाठी 7057475610 / 9096259202 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन रावसाहेब सुर्यवंशी ,  शशिकांत घाडगे , धन्यकुमार पाटील , नवनाथ जाधव , सिद्धेश्वर रोंगे , सचिन कुलकर्णी , ज्ञानेश्वर कुंभार , प्रविण गुंड व छत्रपती परिवाराच्या वतीने केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: छत्रपती परिवारमंगळवेढा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

​​ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन

September 8, 2026
Next Post

नागरिकांनी आमदारांसमोर वाचला मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारीचा पाढा; आमदार आवताडे संतापले, म्हणाले काम करायचे नसेल तर....

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..