टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून आज पुन्हा 8 जणांचा बळी गेला आहे तर नव्या 209 कोरोना बाधितांची भर पडली आहे. 84 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
( Solapur rural corona news update )
‘या’ भागात कोरोना आठ बळी
सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील 45 वर्षिय पुरुष, अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील 65 वर्षिय पुरुष,वैराग मधील 78 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथील पन्नास वर्षिय पुरुष, बार्शी तालुक्यातील साकत येथील 61 वर्षिय पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील 62 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील 65 वर्षीय महिला, माळीनगर येथील 58 वर्षीय पुरुष या आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
आज नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, आरळी, शिरनांदगी, पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, भोसे, एकलासपूर, करकंब, कासेगाव, खेड भाळवणी, कोर्टी, लक्ष्मी टाकळी, लोणारवाडी, ओझेवाडी, रोपळे, शिरगाव सुस्ते, वाखरी,सांगोला तालुक्यातील बामणी, चिकमहूद, एकतपुर, गोडवाडी, जवळा, खवसापूर, महूद, उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी, गावडी दारफळ, कोंडी, वडाळा, मोहोळ तालुक्यातील कुरुल,यावली येथील रुग्णांचा समावेश आहे.
अक्कलकोट तालुक्यातील हत्तीकणबस, कर्जाळ, कुरनूर, करमाळा तालुक्यातील भगतवाडी, दहिगाव, पिंपळवाडी, वीट, माढा तालुक्यातील कुर्डू, म्हैसगाव, मानेगाव माळशिरस तालुक्यातील अकलूज, बोरगाव, कन्हेर, माळीनगर, मांडवे, पठाण वस्ती, संगम, संग्रामनगर, शिंदेवाडी, श्रीपूर, वेळापूरचा समावेश आहे.
बार्शी तालुक्यातील दडशिंगे, जामगाव, खामगाव, कोरफळे, पांगरी, सौंदरे, उंबरगे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रूप, औज मंद्रूप, बरुर, हत्तुर, होटगी स्टेशन, कुंभारी, मुस्ती, वळसंग तांडा व वळसंग येथील बाधित यांचा समावेश आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज