टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या पायाभूत व मूलभूत सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी ४ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
सदर योजनेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींची स्थळे, तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या स्थळांचा विकास करणे व त्यांची स्मारके उभा करणे आदी कामांचा समावेश असल्याची माहिती आ.आवताडे यांनी दिली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या शिक्षण, आरोग्य, रस्ते पाणी या सुविधा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी या महत्त्वकांक्षी योजनेमार्फत हा भरीव निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या सदर निधीमुळे मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व धोरणात्मक विकासासाठी मोठी चालना मिळणार आहे.
सदर योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील निधी मंजूर झालेली गावे व कामे –
१) मौजे कौठाळी येथे दलित वस्ती अंतर्गत मस्के वस्ती येथे पोहोच रस्ता बांधणे २) मौजे शिरढोण येथील नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये व्यायामशाळा बांधणे ३) मौजे वाखरी येथे नवबौद्ध घटकांच्या ज्ञानेश्वर गायकवाड घरापर्यंत पोहोच रस्ता करणे ४) मौजे गादेगाव येथे नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये व्यायामशाळा बांधणे
५) मौजे कोर्टी येथे नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये वाचनालय बांधणे ६) मौजे लक्ष्मी टाकळी येथील नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये शिवपार्वती नगर व हद्दवाढ येथील रस्ता दुरुस्त आणि सुधारणा करणे ७) मौजे उंबरगाव येथील नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये उंबरगाव – गादेगाव रस्ता व प्रकाश चंदनशिवे घरापर्यंत रस्ता करणे ८) मौजे बोहाळी येथील नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये मेन रोड बोहाळी ते मातंग वस्ती रस्ता करणे
९) मोजे खर्डी येथे गावठाण दलितवस्ती मध्ये व्यायाम शाळा बांधणे १०) मोजे तपकिरी शेटफळ येथे मोरे बनसोडे वस्ती ते संतोष बनसोडे यांच्या घराजवळ पथदिवे बसविणे ११) मोजे तनाळी येथे गावठाण दलित वस्ती मध्ये व्यायामशाळा बांधणे १२) मोजे तनाळी येथे दलित वस्ती ते माणनदी रस्ता करणे १३) मौजे कासेगाव येथे सातवा मैल ते पांडुरंग खिलारे वस्ती रस्ता करणे
१४) मौजे एकलासपूर येथे दलित वस्ती अंतर्गत रस्ता करणे १५) मौजे अनवली येथे भांडारे वस्ती ते रणदिवे वस्ती पोहोच स्ता करणे १६) मौजे कासेगाव येथील चंद्रकांत जाधव मठ वस्ती येथे वाचनालय बांधणे.
सदर योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निधी मंजूर झालेली गावे व कामे –
१) मौजे दामाजीनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये स्वच्छतागृह व अभ्यासिका बांधणे २)संत चोखामेळा नगर येथील मारापुर रोड येथे धनंजय खवतोडे यांच्या घराशेजारी व्यायाम शाळा बांधणे व पथदिवे बसविणे ३) संत चोखामेळा नगर अंतर्गत एकविरा माळ येथील प्रमोद कांबळे ते लाळे डेअरी पर्यंत रस्ता करणे व दोन्ही बाजूस पथदिवे बसविणे
४) संत दामाजी नगर येथील शिंदे घोडके वनखंडे वस्ती येथे अभ्यासिका बांधणे ५) मौजे माचनूर येथे संविधान भवन बांधणे ६) मौजे माचनूर येथील चांभार वस्ती येथे सभामंडळ बांधणे ७) मौजे घरनिकी येथील दलित वस्ती येथे आर.ओ सिस्टीम बसवणे ८) मौजे मानेवाडी येथे तूपसौवन वस्ती व गेजगी वस्ती येथे स्मशानभूमी बांधणे
९) मौजे हिवरगाव येथे दलित वस्ती अंतर्गत पेविंग ब्लॉक बसवणे १०) मौजी येळगी येथील शिंदे भोरकडे वस्ती येथे व्यायाम शाळा बांधणे ११) मौजे सोड्डी येथील दलित वस्ती अंतर्गत स्मशानभूमीपर्यंत रस्ता करणे १२) मौजे ढवळस येथे गावठाण जागेत मध्ये बौद्ध विहार बांधणे
१३) मंगळवेढा शहर शहर साठे नगर येथे अभ्यासिका बांधणे १४) मंगळवेढा शहर साठे नगर येथे सार्वजनिक पुरुष व महिला शौचालय बांधणे १५) मंगळवेढा शहर साठे नगर येथे व्यायाम शाळा बांधणे १६) मौजे जित्ती येथे दलित वस्ती येथे व्यायाम शाळा बांधणे १७) मौजे डोणज येथील दलित वस्ती येथे गटार व व्यायामशाळा बांधणे
१८) मौजे रहाटेवाडी येथे भीम नगर येथील मरिमाता मंदिरा शेजारी सभा मंडप बांधणे १९) मौजे आंधळगाव येथे दलितवस्ती या ठिकाणी पथदिवे बसविणे २०) मौजे आंधळगाव येथील आंधळगाव ते लेंडवेचिंचाळे रोडवर डांगेवस्ती येथे व्यायामशाळा बांधणे २१) मौजे आंधळगाव येथे दलितवस्ती या ठिकाणी बोअर मोटर बसवून हौद बांधणे
२२) मौजे आंधळगाव येथील दलित वस्ती या ठिकाणी बहुउद्देशीय सभागृह बांधणे २३) मौजे डोंगरगाव येथील दलितवस्ती या ठिकाणी पथदिवे बसविणे २४) मोजे लेंडवेचिंचाळे येथील दलितवस्ती या ठिकाणी व्यायाम शाळा बांधणे २५) मौजे महदाबाद (शेटफळ) येथे दलितवस्ती अंतर्गत गावठाण जागेत अभ्यासिका बांधणे
२६) मौजे तांबडी येथे आंबेडकर नगर या ठिकाणी आर.ओ सिस्टीम बसवणे २७) मौजे ब्रह्मपुरी येथे दलितवस्ती अंतर्गत अंतर्गत आंबेडकरभवन बांधणे व समाज मंदिर दुरुस्ती करणे २८) मौजे गुंजेगाव येथे नवबौद्ध घटकांच्या ठिकाणी अभ्यासिका बांधणे २९) मौजे शिरनांदगी येथे नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण करणे.
प्रथमतःच निधी मंजूर झाल्याने संपूर्ण दलित समाज आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर जाम खुश
समाजातील दलित व शोषित घटकांच्या चौफेर विकासासाठी आ. समाधान आवताडे यांनी एवढा मोठा निधी उपलब्ध करून सदर घटकांच्या सर्वांगीण प्रगतीची कवाडे मोठ्या व्यापकतेने आणि विस्तृतपणे खुली केली आहेत.
मतदारसंघातील दलित घटकांच्या विकास साधनेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर झाल्याने संपूर्ण दलित समाज आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर जाम खुश झाला आहे – सागर माने – माजी सरपंच, चोखामेळानगर.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज