समाधान फुगारे । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आज पुन्हा रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून 35 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे.त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 289 वर गेली आहे.
आज दि.14 ऑगस्ट रोजी 40 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 37 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 37 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह -3 आणि निगेटिव्ह 34 जणांचे अहवाल आलेले आहेत.
सदर नागरीक हे तामदर्डी 3 येथील निकटतम संपर्कातील आहेत. तर सोलापूर येथे पाठविणेत स्वब ( RT – PCR ) चे आज 32 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदर नागरीक हे मरवडे -3 , अरळी -3 , तामदर्डी -11 , तळसंगी -8 , आंधळगाव -2 , पाठखळ -2 , सलगर खु -1 , लवंगी -1 , मंगळवेढा -1 येथील निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 289
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 159 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 128 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज 15 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांची संख्या ही चिंताजनक बाब आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणीही घराबाहेर पडू नये. गर्दी न करता आपण कोणत्याही संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही आणि आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज