mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राडेखोर! महिलेकडे सहाय्यक शिक्षणाधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र; किरण लोहार यांच्यावर महिलेचा गंभीर आरोप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 29, 2022
in शैक्षणिक, सोलापूर
शिक्षणाधिकारी लोहारच्या घराची पहाटेपर्यंत झाडाझडती, ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर; मिळाली पोलीस कोठडी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सहायक शिक्षणाधिकारी असल्याचे सांगून दक्षिण सोलापुरातील शाळांची तपासणी करणाऱ्या जाकीरा फिरदोस गफ्फार शेख, शाहिद उल्लू खान या दोघांना वळसंग पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

त्यानंतर पोलिसांनी नांदेड व सोलापूर जिल्हा परिषदेकडून त्या महिलेसंबंधीची माहिती मागविली होती.

पण, ती महिला आमच्याकडे कोणत्याही पदावर कार्यरत नसल्याचा खुलासा दोन्ही जिल्हा परिषदांनी पोलिसांना पाठविल्याने तिच्याकडील ओळखपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासंदर्भात आता पोलिस सत्यता पडताळून कारवाई करतील.

नांदेडच्या शिक्षण विभागाचे बनावट ओळखपत्र तयार करून दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची तपासणी करणाऱ्या महिलेकडील ‘महाराष्ट्र शासन’ असा फलक लावलेली चारचाकी वळसंग पोलिसांनी जप्त केली आहे.

दरम्यान, त्या महिलेने बुधवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात येऊन मोठा गोंधळ केला. तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मला, शिक्षण खात्याचे ओळखपत्र बनवून दिले.

शिक्षण खात्यात भरपूर नोकऱ्या आहेत, उमेदवार आणा, असे सांगून त्यांनी पैसे घेण्यास सांगितले. जवळपास ४०० जणांचे २० ते २२ लाख रुपये मी तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला दिल्याचा आरोप देखील त्या महिलेने यावेळी केला.

प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याशी हुज्जत घालत त्या महिलेने गोंधळ घातला. दरम्यान, त्या महिलेचे आरोप बिनबुडाचे असून

त्या महिलेकडील ओळखपत्र बनावट असून तिच्यावर कोणीच विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्री.जावीर यांनी बोलताना मुख्याध्यापक व शिक्षकांना केले आहे.(स्रोत:सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: किरण लोहार

संबंधित बातम्या

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 17, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
Next Post
पंढरपूर अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध; प्रशांत परिचारक यांचे बँकेवर वर्चस्व कायम; विरोधकांची खेळी अयशस्वी

पंढरपूर अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध; प्रशांत परिचारक यांचे बँकेवर वर्चस्व कायम; विरोधकांची खेळी अयशस्वी

ताज्या बातम्या

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 17, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..