टीम मंगळवेढा टाईम्स।
तुझा भाऊ पैसे कधी देणार अशी विचारणा करीत एका 65 वर्षीय महिलेच्या दोन्ही दंडाला धरून लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी परमेश्वर येणपे(रा.नंदूर) याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील पिडीत महिला तथा फिर्यादी ही तीच्या गावी खुपसंगी येथील शेतात असताना दि.24 रोजी 4.00 वा.
यातील आरोपी परमेश्वर येणपे याने फिर्यादीजवळ येवून तुझा भाऊ पैसे कधी देणार आहे असे म्हणून शिवीगाळ करीत पिडीतेच्या दोन्ही दंडाला धरून
तुला मी विहिरीत ढकलून देतो, तुइयावर बलात्कार करतो असे म्हणून पिडीतेचा ब्लाऊज ओढून तीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून
डाव्या हातावर काठीने मारून जखमी करून तुला जीवंत सोडणार नाही असे म्हणून निघून गेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज