टीम मंगळवेढा टाईम्स।
दामाजी नगर प्रभाग क्रमांक दोन मध्ये डेंगू सदृश्य रोगाचे पेशंट आढळल्याने दामाजीनगरचे सरपंच जमीर सुतार व प्रभाग क्रमांक दोनचे ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब आसबे यांनी तहसीलदार स्वप्निल रावडे व गटविकास अधिकारी एस. जे. पाटील यांची भेट घेतली.
बोराळे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शेख मॅडम तसेच ग्रामसेवक अरुण मोरे यांना तात्काळ उपायोजना करण्याच्या सूचना केल्यामुळे आज प्रभाग क्रमांक दोन दामाजी नगर येथे कोरडा दिवस पाळण्याचे व औषधीकरण करण्याचे नियोजन केले होते.
त्यावेळी स्वतःग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गायकवाड व अण्णासाहेब आसबे यांनी डॉक्टर व आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांना सोबत घेऊन नागरिकांना डेंगू फैलाव होऊ नये म्हणून काही सूचना केल्या
व कोरडा दिवस पाळला यावेळी नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला व शंभर टक्के कोरडा दिवस पाळण्यात आला होता.
हिवताप एनॉफिलस आणि डेंगी, चिकुनगुनिया आजार पसरविण्यास एडिसइजिप्ती डास कारणीभूत असतात. त्यापैकी एनॉफिलस अस्वच्छ आणि एडिस डासांची मादी घरात साठवलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते.
हिवताप, डेंगी किंवा चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीला डास चावल्यास रोग्याच्या रक्तातील विषाणू डासाच्या शरीरात शिरतात. हा विषाणूजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते.
त्यामुळे रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालवा लागणार आहे. त्यापासून संरक्षण होण्यासाठी आणि डास चावू नये, यासाठी डास उत्पत्तीस्थळे नष्ट करा आणि होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्या, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज