पंढरपूर : राजेंद्र फुगारे
पंढरपूर येथे आज दुपारी एक वाजताच्या सुमारास धाकादायक घटना घडली आहे. येथे एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
संदीप जाधव असे या मृत तरुणाचे नाव आहे. इसबावी तालुका पंढरपूर येथील सह्याद्री नगर येथे सदर घटना घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
संदीप हे विवाहित असून त्यांना दोन अपत्ये होती. संदीप यांनी दारातल्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.
या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संदीप यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज