टीम मंगळवेढा टाईम्स ।
नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणानंतर आज सोलापूरकरांना आता चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे.
सोलापुरात आज मंगळवारी दुपारी दीड वाजता चंद्रग्रहणास सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५.५४ वाजता चंद्रग्रहण पाहता येणार आहे.
ग्रहणादरम्यान चंद्र हा लाल ( ब्लडमून ) दिसणार आहे. चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे.
जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होत असते. या घटनेत जेव्हा पृथ्वी चंद्राला पूर्णपणे व्यापते, तेव्हा संपूर्ण चंद्रग्रहण होते.
या घटनेत संपूर्ण चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि त्या सावलीत चंद्र दिसेनासा होतो. यंदा होणाऱ्या चंद्रग्रहणावेळी देखील पृथ्वी चंद्राला पूर्णपणे व्यापणार आहे त्यामुळे हे पूर्ण चंद्रग्रहण असेल या घटनेला ब्लड मुन देखील म्हंटले जाते.
गुरु, शुक्र, शनी पाहण्याची संधी
आज या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असून ते भारतात दिसणार आहे. सोलापूर विज्ञान केंद्रातील अत्याधुनिक टेलिस्कोपद्वारे चंद्रग्रहण तसेच आकाशदर्शनाद्वारे गुरु ग्रह, शनी ग्रह आणि शुक्र ग्रह पाहण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.
कुटुंबासमवेत आनंद घ्या ..
चंद्रग्रहण ही एक दुर्मीळ खगोलीय घटना आहे. कोणतीही अंधश्रद्धा मनात न बाळगता, या संपूर्ण खगोलीय घटनेचा आपण आपल्या कुटुंबासमवेत आनंद घ्यावा, असे आवाहन सोलापूर विज्ञान केंद्राचे संग्रहालय अभिरक्षक राहुल दास यांनी केले आहे.
चंद्र लाल का दिसतो… ?
जेव्हा संपूर्ण चंद्रग्रहण होते तेव्हा चंद्र पूर्णपणे लाल दिसतो . त्यामुळे याला ‘ ब्लड मून ‘ असेही म्हणतात . जेव्हा सूर्याची किरणे पृथ्वीच्या वातावरणातून चंद्रापर्यंत पोहोचतात तेव्हा वातावरणात असलेल्या सूक्ष्म आणि धूलिकणांमुळे चंद्र आपल्याला लाल दिसतो.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज