टीम मंगळवेढा टाईम्स।
ज्येष्ठ नागरिकांनी मुलांच्या नावावर जरी आपली संपत्ती केली असेल आणि पुढे मूल त्यांचा सांभाळ करत नसेल तर ती संपत्ती परत स्वत:च्या नावावर करता येते.
कायद्यात तशी तरतूद असल्याचे सांगून अशा मुलांकडून ज्येष्ठ नागरिक पोटगीचीही मागणी करू शकतात, असे प्रतिपादन न्या.एस.बी.विजयकर यांनी केले.
ते बार्शी तालुका विधी सेवा समिती व बार्शी वकील संघ यांच्या वतीने बार्शी तालुक्यात शेंदी येथे आयोजित केलेल्या कायदेविषयक कार्यक्रमात बोलत होते.
सर्वसामान्य लोकांना कायद्याची माहिती झाल्यास सर्वत्र कायद्याचे राज्य प्रस्थापित होईल यातून चांगला समाज, चांगला गाव, चांगला देश घडतो.
म्हणून चांगला देश घडविण्यासाठी प्रत्येकाला कायद्याची, हक्क व कर्तव्यांची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत सहदिवाणी न्या.विजयकर यांनी व्यक्त केले.
यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.सी.जगदाळे, बार्शी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अविनाश जाधव, अॅड.संजय कोकाटे, अॅड.शंकर ननवरे, अॅड.स्वप्नील खंडागळे, सरपंच महादेव चव्हाण, गुणवंत कांबळे, अजिज सय्यद, शिवाजी शिंदे उपस्थित होते.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज