टीम मंगळवेढा टाईम्स ।
जगातील श्रीमंत देवस्थान तिरुमाला तिरुपती देवस्थानमने संपत्ती जाहीर केली. भाविकांनी कोरोना काळातही देवस्थानला भरभरुन दान केल्याचे यामध्ये उघड झाले.
तिरूपती देवस्थान संपूर्ण देशातूलच नव्हे तर विदेशातील भाविकांचंही श्रध्दास्थान आहे. देशातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या या तिरुमला तिरुपती देवस्थाने शनिवारी एक श्वेतपत्रिका जारी केली.
या श्वेतपत्रीकेच्या माध्यमातून त्यांनी तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टकडे असलेली संपत्ती जाहीर केली आहे. यात मुदत ठेवी आणि सोन्याच्या ठेवींसह त्यांच्या मालमत्तेची यादी आहे.
मंदिर ट्रस्टने सांगितले की त्यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 10.3 टन सोन्याच्या ठेवी आहेत. त्यात ₹15,938 कोटी रोख ठेवी आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, विद्यमान विश्वस्त मंडळाने 2019 पासून आपल्या गुंतवणूकीबद्दलची मार्गदर्शक तत्त्वे अधिक मजबूत केली आहेत.
यासोबतच तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष आणि मंडळाने आंध्र प्रदेश सरकारच्या सिक्युरिटीजमध्ये अतिरिक्त निधी गुंतवण्याचा निर्णय घेतल्याच्या सोशल मीडियावरील वृत्त फेटाळून लावले आहे.
ट्रस्टचे म्हणणे आहे की अतिरिक्त रक्कम शेड्यूल्ड बँकांमध्ये गुंतवली जाते. तिरुमला तिरुपती देवस्थानने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
(तेलुगू भाषेतील पत्रकानुसार) “श्रींच्या भक्तांना विनंती आहे की त्यांनी अशा कट रचलेल्या खोट्या प्रचारावर, अफवा अथवा वृत्तांवर विश्वास ठेवू नये. टीटीडीने विविध बँकांमध्ये केलेल्या रोख आणि सोन्याच्या ठेवी अतिशय पारदर्शक पद्धतीने केल्या जातात.
यात SBI बँकेत 30 सप्टेंबर 2022ला 5,358.11 कोटी रूपये, Union Bank of India मध्ये 1694.25 कोटी रुपये, Bank Of Baroda मध्ये 1839.36 कोटी रुपये,
Canera Bank मध्ये 1351 कोटी रुपये, Axis Banket 1006.20 कोटी रुपये, HDFC Limited Bank मध्ये 2122.85 कोटी रुपये, PNB मध्ये 660.43 कोटी रुपये TTD कडून जमा करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज