टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणाचे पाणी इंदापूर आणि बारामतीला एक थेंबही जावू देणार नाही असे आश्वासन पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे.
विखे-पाटील यांच्या भुमिकेने पुन्हा एकदा उजनीच्या पाण्याचा वाद पेटणार की काय अशी चर्चा हाेऊ लागली आहे.
मंगळवेढा येथे आवताडे साखर कारखान्या गळीत हंगाम कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री विखे पाटील यांनी उजनीच्या पाण्याच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली.
उजनीच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांचा हक्क आहे. त्यांच्या हक्काचं पाणी इंदापूर बारामतीला कोणत्याही परिस्थितीत जावू देणार नाही असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातून इंदापूर बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी पाच टीएमसी उपसा सिंचन योजना मंजूर केली होती.
या योजनेला सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांचा तीव्र विराेध आहे. शेतक-यांच्या विरोधा नंतर ही भरणे यांनी योजनेसाठी मोठा निधीही मंजूर केला होता.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता इंदापूर आणि बारामतीला उजनीतून एक थेंबही पाणी जावू देणार नसल्याचे पालकमंत्र्यी विखे-पाटील यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उजनीचे पाणी पेटल्याची चर्चा हाेऊ लागली आहे.(स्रोत:साम TV)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज