टीम मंगळवेढा टाईम्स ।
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची स्थगित केलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील, भाजपचे सहयोगी सदस्य माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यामध्ये ही लढत होणार आहे.
श्री संत दामाजी कारखान्याचा अनुभव पाठीशी असल्यामुळे भीमा कारखान्यात निवडणुकीत परिचारक यांच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे.
महाडिक यांचे गेल्या दहा वर्षांपासून भीमा कारखान्यावर सत्ता आहे. त्यापूर्वी सुधाकरपंत परिचारक आणि राजन यांच्या पाटील गटाचे वर्चस्व होते.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये राजन पाटील आणि परिचारक गटाला महाडिक गटाने धूळ चारली आहे.
भाजप आमदार समाधान आवताडे यांचा संत दामाजी सहकारी साखर कारखान्यामध्ये पराभव केल्यानंतर आता परिचारक यांची भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये भूमिका निर्णायक ठरणार आहे.
दामाजी कारखान्यासारखं भीमा कारखान्यामध्ये सुद्धा आपल्या सहकाऱ्यांना उभे करून राष्ट्रवादीसोबत जाऊन भीमा कारखाना ताब्यात घेण्याची परिचारकांची रणनीती येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.
मुळत : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंड असलेले परिचारक यांचे भाजपसारख्या केडर पक्षात त्यांचे मन रमताना दिसत नाही.
भाजप आमदार समाधान अवताडे यांच्या विरोधात दामाजी कारखान्यात भूमिका घेतली. तिथे यश आल्यामुळे परिचारक यांनी आता भीमा कारखान्यात भाजप खासदार महाडिक यांच्या विरोधात भूमिका घेतल्यास भाजप पक्षश्रेष्ठींना ती खटकणार आहे.
आधीच राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी असल्यामुळे परिचारक यांच्यावर ठपका आहे. त्यात पक्षातील आमदार, खासदार यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन परिचारक लढत आहेत.
त्यामुळे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक यांच्या भूमिकेवरून त्यांचे भाजपातील भवितव्य ठरणार असल्याचे बोलले जात आहे.(स्रोत:सुराज्य)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज