टीम मंगळवेढा टाईम्स।
मागील तीन दिवसापासून सुरू असलेला महोत्सव आज बुधवारी अंतिम दिवसापर्यंत आला आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी युवा महोत्सवाचा चॅम्पियन ठरणार आहे.
गोल्डन बॉय व गोल्डन गर्ल बाबत ही तरुणाईत उत्साह दिसत आहे. सर्वात आकर्षक हे अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचे असणार आहे.
सोलापूर विद्यापीठाचा 18 वा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. तीन दिवसांत एका पेक्षा एक प्रकार चुरशीने सादर करून विद्यार्थ्यांनी स्पर्धा वाढवली.
आज सकाळी शुभयात्रा या स्पर्धेने युवा महोत्सवाची सांगता होणार आहे. विद्यापीठाच्या युवा महोत्सवात पहिल्या दिवशी मूकनाट्य समूहगीत एकांकिका या सह विविध स्पर्धा पार पडल्या.
दुसऱ्या दिवशी पथनाट्य, फोक आर्केस्ट्रा तर तिसऱ्या दिवशी लघुनाथिका लोकनृत्य स्पर्धा पार पडल्या.
दरम्यान सर्व स्पर्धा चुरशीने झाल्या आहेत विविध महाविद्यालयात नवखी टीम असल्यामुळे काहींना बरेच शिकायला मिळाले काहींनी संधीचे सोने करून घेतले.
आज होणाऱ्या सांगता सभारंभास सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू ही उपस्थित राहणार असून हिच्या हस्ते आज पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज