टीम मंगळवेढा टाईम्स । ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने शुक्रवारी अध्यक्षपदाची निवडीची प्रक्रिया जाहीर केली असली तरी यावेळी संचालक मंडळातील सदस्य उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे इच्छुकांना काही दिवस वाट पाहावी लागणार असून , तोपर्यंत संघाच्या कामकाजाची सर्व सूत्रे संघाची ज्येष्ठ संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले यांच्याकडे राहणार आहेत.
आमदार प्रशांत परिचारक यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड शुक्रवारी करण्यात येणार आहे. या अध्यक्षपदासाठी संचालक मंडळातील माजी आमदार दिलीप माने,आमदार संजय शिंदे यांची नावे चर्चेमध्ये होती.
त्याचबरोबर संघाचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र राजेभोसले हे अध्यक्षपदासाठी आग्रही होते.यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरीने मोर्चेबांधणी करत होते. सोमवारी ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे ही सर्व प्रक्रिया लांबण्याची चिन्हे दिसत आहेत.
शुक्रवारी संघाच्या मुख्यालयात पुणे विभागाचे उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन अध्यक्ष निवडीसाठी संघाच्या संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे सदर बैठकीला सर्व संचालक गैरहजर राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे ही सभा तहकूब होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारची सभा तहकूब झाल्यास सात दिवसाच्या अवधीनंतर दुसरी सभा बोलवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. संचालक मंडळातील एका माजी आमदाराने परिचारक यांचा राजीनामा मंजूर करून घेण्याबाबत मोठी भूमिका बजावली असून आणि ते अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची ही माहिती समोर येत आहे. त्यांना शह देण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाच्या वतीने करमाळ्याच्या बाहुबली आमदाराचे नाव पुढे करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघावर राष्ट्रवादीची सत्ता असून यामध्ये दोन संचालक शेकापचे आहेत.पूर्वी राष्ट्रवादीत असलेले व सध्या भाजपचे सहयोगी आमदार असलेले प्रशांत परिचारक यांचा संचालक मंडळात वरचष्मा आहे. त्यामुळे ज्यांच्या बाजूने परिचारक आपले बळ लावतील तेच दूध पंढरीचे नवे मालक होतील. यासाठी काय तडजोडी केल्या जातील हा संशोधनाचा विषय आहे.ज्यापद्धतीने परिचारक यांचा राजीनामा मंजूर करून घेतला आहे.यावरून परिचारक हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
सोमवारी रात्री माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे या सर्व राजकीय घडामोडी थांबल्या आहेत.यामुळेच शुक्रवारची होणारी बैठक तहकूब होण्याची चिन्हे आहेत. आमदार प्रशांत परिचारक यांचा राजीनामा मंजूर केल्यामुळे अध्यक्षपद पद रिक्त आहे तर उपाध्यक्ष मनोहर डोंगरे हे काही दिवसापासून संघाच्या कामकाजापासून आली आहेत. यामुळे सह्यांचे अधिकार ज्येष्ठ संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले यांच्याकडे संघाचे यापुढील कारभाराचे अधिकार राहणार आहेत.
(source : DivyaMarathi )
शुक्रवारी नियोजित वेळेनुसार संघाच्या कार्यालयात बैठक घेण्यात येईल.संचालक मंडळाचा कोरम पूर्ण न झाल्यास सभा तहकूब करण्यात येईल. त्यानंतर सात दिवस किंवा माझ्या सोयीच्या वेळेनुसार परत अध्यक्षपदासाठी सभा घेण्यात येईल.- सुनील शिरापूरकर,उपनिबंधक पदुम,पुणे विभाग.
ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे नुकतेच निधन झाले आहे. अशा परिस्थितीत आमदार प्रशांत परिचारक यांचा उत्तराधिकारी ठरवणे बरोबर नाही. यामुळेच शुक्रवारी सर्व संचालक मंडळ बैठकीस अनुपस्थित राहणार आहे.- राजेंद्रसिंह राजेभोसले,ज्येष्ठ संचालक, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ.
Election of Solapur District Milk Association President postponed, possibility of meeting tomorrow
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज