टीम मंगळवेढा टाईम्स ।
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी पदी आ.शहाजीबापू पाटील निवड यांची केली.
रविवारी ठाणे येथे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
गोरगरिबांना पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट , यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत आहे.
या कक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या ब्रँड अॅम्बेसिडर पदी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांची निवड केली आहे.
त्यांच्या माध्यमातून राज्यातील रुग्णांमध्ये जनजागृती करून रुग्णांना विविध योजनांचा निश्चितच फायदा होणार आहे.
एकही रुग्ण उपचाराविना राहणार नाही, असा विश्वास यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी कक्षप्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यातील रुग्णांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज