टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे आज सोमवार व मंगळवार सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आहेत.
सोमवार दि.१३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता सांगोला येथील एका उद्घाटन समारंभासाठी ते उपस्थित राहणार आहेत.
दुपारी दोन वाजता ते सांगोला येथे भाजप कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. दुपारी तीन वाजता ते सोलापूरकडे प्रयाण करणार आहेत.
सायंकाळी चार वाजता गुजराती मित्र मंडळास भेट देणार असून, साडेपाच वाजता श्री.बसवारूढ महास्वामी मठाकडे प्रयाण करणार आहेत.
रात्री आठ वाजता तुळजापूरकडे प्रयाण करणार आहेत. रात्री साडेअकरा वाजता आ.समाधान आवताडे यांच्या फार्म हाऊस येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.
उद्या मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता मंगळवेढा येथे पक्ष कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता श्री.विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर येथे त्यांचे आगमन होणार आहे.
दुपारी बारा वाजता प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या निवासस्थानी त्यांचे आगमन होणार आहे. दुपारी एक वाजता पंढरपूर येथून वाहनाने ते कोल्हापूरकडे प्रयाण करणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज