टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील नव्याने सुरू झालेल्या शिर्के मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आय.सी.यू येथे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, वार्डबॉय व मावशी पदासाठी मोठी भरती होणार असल्याची माहिती संचालक डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
‘या’ पदांसाठी होणार भरती
एम.बी.बी.एस (MBBS) / बी.ए.एम.एस (BAMS)/ बी.एच.एम.एस (BHMS) या पदासाठी तीन जागा भरायच्या आहेत.
नर्सिंग स्टाफमध्ये ए.एन.एम (ANM) / जी.एन.एम (GNM) या पदासाठी प्रत्येकी पाच जागा भरणार आहेत.
वोर्डबॉय या पदासाठी 10 वी पासची अट असून तीन जागा भरणार आहेत.
मावशी या पदासाठी सहा जागा भरणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अनुभव असणाऱ्यांना योग्य ते मानधन दिले जाणार असून इच्छूक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.
‘येथे‘ होणार मुलाखत
रविवार दि.11 सप्टेंबर रोजी शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आय.सी.आय.सी.आय बँकेसमोर मुरलीधर चौक येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत मुलाखत होणार आहे.
येथे करा संपर्क
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 7028687291 किंवा 9021578180 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज