टीम मंगळवेढा टाईम्स ।
बंडगार्डन व दौंड येथून उजनीच्या दिशेने येणारा विसर्ग काहीसा कमी झाला असला तरी धरणाची वाटचाल पन्नाशीच्या दिशेने चालू आहे. सोमवारी सायंकाळी धरण ४८ टक्के भरले आहे.
धरणाचा एकूण जलसाठा ८९.१२ टीएमसी एवढा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगावर मागील दहा-अकरा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस कमी झाला आहे.
बंडगार्डन व दौंड येथून येणारा विसर्गही शनिवारपासून कमी – कमी होत आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी संथगतीने वाढत आहे.
पुणे जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणाच्या वरील धरणातही बऱ्यापैकी जलसाठा झाला आहे.
त्यामध्ये खडकवासला, कळमोडी, आंद्रा ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर भामाआसखेड (८६ टक्के), चासकमान (८४ टक्के), येडगाव ( ९ ३ टक्के ) , कासारसाई ( ८६ टक्के ) वडजमध्ये ७२ टक्के एवढा जलसाठा झाला आहे.
या धरणातूनही नदीपात्रात पाणी सोडल्याने मागील आठ दिवसात बंडगार्डन व दौंड येथून उजनी धरणाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात विसर्ग आल्याने चालूवर्षी दाजुलैला दिवस अगोदरच धरण प्लसमध्ये येण्यास सुरुवात झाली होती.
दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग काही प्रमाणात मंदावला असला तरी मागील २४ तासात पाणीसाठा पाच टक्क्याने वाढन तो ४८ टक्के झाला आहे.(स्रोत:लोकमत)
मागील वर्षी २२ दाजुलैला धरण प्लसमध्ये
■ मागील वर्षी दि.१७ जुलै रोजी धरणातील उपयुक्त जलसाठा शून्य टक्के होता. त्याचा विचार करता चालू वर्षी समाधानकारक जलसाठा झाला आहे.
■ मागील वर्षी २२ जुलै रोजी धरण मायनसमधून प्लसमध्ये आले होते. यावर्षी ते दहा दिवस अगोदरच प्लसमध्ये आले आहे.
धरणाची सद्य : स्थिती
एकूण पाणी पातळी ४९४.१७५ मीटर
एकूण जलसाठा ८९.१२ टीएमसी
उपयुक्त जलसाठा २५.४६ टीएमसी
टक्केवारी : ४७.५२ %
बंडगार्डन : ११०६१ क्युसेक दौंड : २३९९५ क्युसेक
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज