टीम मंगळवेढा टाईम्स।
जेवणातून 32 वारक्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर येथे घडली आहे. 65 एकर येथील विठ्ठल मठात एक धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
पंढरपूर येथील शेगाव दुमाला हद्दीत असलेल्या श्री विठ्ठल आश्रमात रविवारी दुपारी जेवण केल्यानंतर ३२ वारकऱ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
या सर्वांनी जेवणासोबत बासुंदी खाल्ली होती, अशी प्राथमिक माहिती असून सर्वांना पोटदुखी, उलट्या, जुलाव होऊ लागल्यानंतर रविवारी रात्री पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चंद्रभागा नदीपलीकडे शेगाव दुमाला हद्दीत श्री विठ्ठल आश्रम मठ आहे. या ठिकाणी चातुर्मासाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी अनेक वारकरी मुक्कामी राहिले आहेत.
रविवारी दुपारी या सर्वांनी एकत्र जेवण केले. भात, भाजी, चपाती, भजी आणि बासुंदी अशा पदार्थाचा जेवणात समावेश होता.
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास अनेकांना पोटदुखी, उलट्या, जुलाब असा त्रास होऊ लागला. एकाचवेळी अनेकांना हा त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे ३२ जणांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांनी जेवणात खाल्लेल्या बासुंदीतून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या अनुषंगाने सर्व अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी सांगितले.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज