टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. आज मंगळवार, दि.१२ जुलै रोजी २८ हजार ५३५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत १०८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
मतदान प्रक्रियेसाठी ६४८ कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये ६० कर्मचारी राखीव मध्ये असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांनी दिली.
या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी संपली असून दामाजी कारखान्याची निवडणूक दुरंगी होत आहे. २० जागांसाठी ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
ब्रह्मपुरी, मंगळवेढा, मरवडे, आंधळगाव व भोसे या पाच गटांतून १९ जागांसाठी व संस्था गटातून १ असे २० जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे.
प्रत्येक केंद्रावर ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पोलीस बंदोबस्तासह ६ कर्मचारी अधिकारी कार्यरत राहणार आहेत.
निवडणूक कर्मचाऱ्यांना सहायक निवडणूक अधिकारी पंकज राठोड यांनी मतदान प्रक्रियेबाबतचे प्रशिक्षण दिले आहे.
मतदानासाठी सभासदांनी कारखान्याच्या ओळखपत्राबरोबरच आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र पॅनकार्ड यापैकी एक पुरावा सोबत आणणे गरजेचे आहे.
सत्ता कोणाकडे , गुरुवारी फैसला
दि.१४ जुलैला सकाळी आठ वाजता मंगळवेढा येथील शासकीय गोडाऊनमध्ये ३१ टेबलांवर मतमोजणी केली जाईल. यासाठी १६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक टेबलासाठी ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टेबलसंख्या वाढवल्याने निकाल रात्री बारापर्यंत हाती येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पंकज राठोड यांनी दिली.
सहा संवेदनशील केंद्रावर पोलिसांचे विशेष लक्ष
मुढवी , गोणेवाडी , उचेठाण , रहाटेवाडी , हिवरगाव , कागष्ट या सहा संवेदनशील मतदान केंद्रांवर गोपनीय विभागाचे विशेष लक्ष असून , या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज