mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आषाढी वारीनंतर कोण मंत्री? कोण वेटिंगवर? आवताडेंच्या नावाची चर्चा, संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी; एका क्लिकवर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 11, 2022
in मंगळवेढा, राजकारण, राज्य
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आषाढी एकादशीनंतरच, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं.

आज आषाढी एकादशी आहे आणि उद्या 11 जुलैला सुप्रीम कोर्टात 16 आमदारांची अपात्रता आणि सुनिल प्रभूंच्या व्हिपवरुन सुनावणी आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे शिंदे-फडणवीसांचं लक्ष आहे. त्यामुळं 12 किंवा 13 जुलैला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

त्यातही पहिल्या टप्प्यात 13 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. ज्यात भाजपचे 8 आणि शिंदे गटाकडून 5 जण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.

यात पहिल्या रांगेत कुणाची वर्णी लागणार आणि कुणाला वेटिंगवर राहवं लागणार? याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आम्ही तुम्हा तो सस्पेन्सही थोडा सोपा करून सांगतोय.

भाजपकडून कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात?

चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत. पण ही जबाबदारी इतर नेत्यांकडे दिली जाईल. चंद्रकांत पाटील फडणवीस सरकारमध्ये महसूलमध्ये होते.

भाजपकडून दुसरं नाव सुधीर मुनगंटीवारांचं अधिक चर्चेत आहेत. 2014 ते 2019 मध्ये मुनगंटीवार अर्थमंत्री होते.

गिरीश महाजनही कॅबिनेट मंत्री होऊ शकतात. फडणवीस सरकारमध्ये महाजनांनी जलसंपदा मंत्रिपदाची धुरा सांभाळली.

आशिष शेलारांचाही मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्याच टप्प्यात नंबर लागू शकतो. शेलारांना कॅबिनेटमध्ये संधी मिळेल असं बोललं जातंय.

फडणवीस सरकारमध्ये शेवटच्या काही महिन्यांमध्ये शेलारांना संधी मिळाली होती. त्यावेळी ते शालेय शिक्षण मंत्री होते.

चंद्रकांत पाटलांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी दिली तर भाजपला नव्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड करावी लागेल. आणि त्यासाठी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव चर्चेत आहे.

भाजपनं मुख्यमंत्रीपदासाठी मराठा कार्ड खेळलं. आणि थेट एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्रिपद दिलं. आता प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा भाजप देऊ शकते. त्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव आघाडीवर आहे.

फडणवीस सरकारमध्ये बावनकुळे ऊर्जा मंत्री होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत, चंद्रशेखर बावनकुळेंना तिकीटच दिलं नव्हतं. त्याचा फटका विदर्भात भाजपला बसला. त्यानंतर विधान परिषदेवर घेऊन बावनकुळेंना आमदार केलं.

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या विजयानंतर राज्यात भाजपची सत्ता येईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्यामुळे मंत्री पदासाठी आमदार समाधान आवताडे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

आता महाराष्ट्र भाजपची कमानंच त्यांच्यावर दिली तर फायदा होईल, असं भाजप वाटतंय.

शिंदे गटाकडून कोण शपथ घेण्याची शक्यता?

शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील शपथ घेऊ शकतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री होते.

दादा भूसेही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये भूसे कृषी मंत्री होते.

शंभूराज देसाईंचाही कॅबिनेट मंत्री म्हणून नंबर लागू शकतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री होते

उदय सामंतही पहिल्याच टप्प्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. याआधी सामंत मविआ सरकारमध्ये उच्च तंत्रशिक्षण मंत्री होते.

प्रहार संघटनेचे बच्चू कडूही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली अशी चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडून शिक्षण राज्यमंत्री होते.

कुणाला कोणतं खाती मिळू शकतात?

4 आमदारांच्या मागे 1 मंत्रिपद या सूत्रानुसार मंत्रिपदाचं वाटप होणार असल्याचं कळतंय. भाजपकडे 25 ते 27 मंत्रिपदं जाण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रिपदं मिळू शकतात.

दिल्लीत शिंदे आणि फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत महत्वाच्या खात्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

गृह, अर्थ, महसूल खातं, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, पाणीपुरवठा ही खाती भाजपकडे जाऊ शकतात. तर शिंदे गटाला नगरविकास खातं, उद्योग खातं, ग्रामविकास, कृषी, परिवहन खातं, पर्यावरण खातं मिळू शकते.

मुख्यमंत्रिपद भाजपनं शिंदेंना दिलं. त्यामुळं इतर खाते वाटपात भाजपचा दबदबा अधिक असेल अशी शक्यता आहे.(स्रोत:TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 18, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक महापूजा, शिंदेंच्या चार पिढ्याने घेतलं दर्शन; पांडूरंगाला घातलं ‘हे’ साकडं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक महापूजा, शिंदेंच्या चार पिढ्याने घेतलं दर्शन; पांडूरंगाला घातलं 'हे' साकडं

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..