टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणूक लागली आहे अनेकांना संचालक, चेअरमन होण्याची स्वप्न पडत आहेत. आज मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान अवताडे यांच्या नावाने काही छोटे राजकीय पुढारी खडे फोडता आहेत.
हे तालुका पाहत आहे ज्या लोकांना आपण कारखान्याचे संचालक व्हावं असे वाटत होते त्यांनी कारखाना जिवंत ठेवण्यासाठी किमान शेतकरी सभासद या नात्याने तरी दामाजी कारखान्याला ऊस घालायला पाहिजे होता.
परंतु, त्यांनी आपला ऊस एक राजकीय मनात राग धरून दामाजीच्या शेजारील इतर कारखान्यांना ऊस घातला असून परंतु त्यांच्या लक्षात आले नाही दामाजी कारखाना चालू राहिला पाहिजे आणि आपण पुढे या कारखान्याची निवडणूक लढवायची व सभासदांचे हित जोपासायचे होते.
तर आपण या कारखान्याला ऊस घालायला पाहिजे होता साखर आयुक्तांचा नियम आहे, ज्या व्यक्तीला ज्या सभासदांना निवडणूक लढवावी असे वाटत असेल तर किमान तीन वर्षे तरी ऊस घातला पाहिजे असे आहे.
परंतु यांनी ऊस घातला नाही यामध्ये अनेकांचे अर्ज बाद झाले हे तालुक्यातील जनतेला माहित आहे. याऊलट अनेक दिग्गज नेत्यांचे साखर कारखाने बंद राहिले. परंतु आ.समाधान आवताडे यांनी दामाजी कारखाना स्वतःच्या नावे व संचालकांच्या नावे कर्ज काढून सक्षम पणे कारखाना चालवला त्यामुळे हे सभासदांना माहित आहे.
परंतु आता विरोधक हे शेतकऱ्यांचे कैवारी होऊ पाहत आहेत. याउलट आमदार समाधान अवताडे यांनी सहा वर्षे कारखाना चालवला त्या हंगामात दुष्काळ, कोरोना परिस्थिती, व अनेक विरोधकांच्या कुरघोड्या ना तोंड देऊन या काळात कारखाना सभासद , शेतकरी, कामगार,
वाहनधारकांना सोबत घेऊन जिल्ह्यात सक्षम कारखाना चालवला त्यामुळे विरोधकांच्या पोटात आग पडली आहे हे शेतकऱ्यांना दिसून येत आहे. परंतु आता विरोधक हे अफवा पसरविण्याचे काम करीत आहे.
त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांची लक्ष्मी समजल्या जाणाऱ्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सभासद मतदार हे योग्य ते न्याय देतील व आमदार समाधान अवताडे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहतील व त्यांचा पॅनल निवडून आणतील.
त्यामुळे विरोधक आता समाधान अवताडे हे आपला दामाजी कारखाना प्रायव्हेट करतील अशा वावड्या उठवत आहेत खरंतर आपल्या तालुक्या शेजारील विठ्ठलची गत कशी झाली , कोणामुळे झाली हे दामाजी चे सभासद बघत आहेत. व शेतकऱ्यांना कामगारांनाही माहित आहे.
त्यामुळे हा कारखाना स्व.मारवाडी वकील व स्व शेडजी यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाधान दादांनी हा कारखाना चालवला आहे. त्यामुळे विरोधक हे वैयक्तिक स्वार्थापोटी रडीचा डाव खेळत आहेत परंतु विरोधकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे होते.
आपण कारखान्याला ऊस घालायला पाहिजे होता आपले अर्ज बाद होणार नाहीत याची काळजी घ्यायला पाहिजे होती किमान आपले राजकीय भवितव्य सिद्ध करण्यासाठी थोडाफार तरी ऊस घालायला पाहिजे होता.
म्हणजे तुम्हाला कारखान्याची निवडणूक लढविता आली असती परंतु आपला ऊस दामाजी ला न घालता इतर कारखान्याला घालायचा आणि अर्ज बाद केले म्हणून आमदारांच्या नावे टाहो फोडायचा हे आता विरोधकांनी बंद करावे.
व खोटे आरोप ही बंद करावे आता आमदार समाधान आवताडे यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा सभासद शेतकरी कामगार व मंगळवेढा तालुक्यातील जनता आमदार समाधान दादा आवताडे यांच्या पाठीशी उभे राहतील असे प्रहारचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज