टीम मंगळवेढा टाईम्स ।
मूलबाळ होत नाही म्हणून पतीसह सासरच्या मंडळीने विवाहितेचा छळ करून तिच्या अंगावरील १० तोळे दागिने काढून घेत तिला घरातून हाकलून दिले. यानंतर पतीने गुपचूप दुसरे लग्न केल्याचा प्रकार पुढे आला आहे.
याबाबत पहिल्या पत्नीने फिर्याद दिली असून, पती सदाशिव एकनाथ ढोले, सासरे एकनाथ महादेव ढोले, सासू आशा एकनाथ ढोले, नणंद त्रिवेणी एकनाथ ढोले, दुसरी पत्नी प्रणाली सदाशिव ढोले (रा.शिवापूर पेठ, अकलूज ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी पहिली पत्नी सुनीता हिचा सन २०१० मध्ये अकलूज येथील सदाशिव ढोले यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर पती, सासू, सासरे, नणंदेने दोन वर्ष व्यवस्थित नांदविले.
त्यानंतर २०१७ पासून मूलबाळ होत नसल्याचे कारण पुढे करून त्रास देऊन मारहाण करू लागले. सततच्या त्रासाला कंटाळून ती आलेगाव (ता.सांगोला) येथील माहेरी आली.
मात्र आईवडील व गावातील लोकांनी सासरच्यांची समजूत काढून तिला नांदण्यास पाठविले.
दरम्यान, मूलबाळ होत नसल्याने तिच्याकडे दुसऱ्या लग्नाची परवानगी मागितली. तिने त्यास नकार दिला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज