टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.विठ्ठल व दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे.
या मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी विठ्ठलच्या सभासदांना २८ तर दामाजीच्या सभासदांना २९ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे.
विठ्ठल कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यामुळे २९ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. कारखान्याचे जवळपास २८ हजार सभासद आहेत.
कारखाना प्रशासनाने १३ एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक निर्णय प्राधिकरणाकडे सभासदांची यादी सादर केली आहे.
त्यानंतर जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांनी १९ एप्रिल रोजी ही प्रारूप मतदार यादी तात्पुरत्या स्वरूपात नियम ९ नुसार प्रसिद्ध केली आहे.
हा निवडणूक कार्यक्रम ३० जुलै २०२२ पूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे . हरकतींसाठी २८ एप्रिलपर्यंत मुदत आहे. २९ एप्रिल ते ९ मे या कालावधीत त्यावर निर्णय होईल दि.१७ मे रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल.
तसेच तसेच श्री संत दामाजी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी बुधवारी (दि. २०) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय व कारखाना कार्यस्थळावर प्रसिद्ध झाली. यात २८ हजार १५७ मतदारांचा समावेश आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दि.१७ फेब्रुवारी रोजी संपली होती.
परंतु, कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली नव्हती. २९ मार्चनंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा सरकारने निर्णय घेतल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली.
प्रारुप मतदार यादीवर हरकतींसाठी २९ एप्रिलपर्यंत मुदत आहे. त्यानंतर दोन मे ते ११ मे या कालावधीत हरकतींवर निर्णय घेतला जाणार आहे. १७ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
दोन्ही राजकीय कारखान्यांवर समीरकरणे अवलंबून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील :
विठ्ठल सहकारी व संत दामाजी या दोन साखर कारखान्यांवर दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे अर्थकारण व राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. त्यामुळे या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.
आता दोन्ही सहकारी साखर कारखान्यांची प्रारूप यादी जाहीर झाल्याने निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. अनेक दिवसापांसून पात्र – अपात्र सभासदांचा विषय रेंगाळला आहे . त्यामुळे यादीत आपला समावेश आहे का, याची खात्री करत होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज